आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रमपरिहार : पराभूत अन् विजयी उमेदवारांसाठी शुक्रवार ठरला झोपेचा दिवस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - गेल्या पंधरा दिवसांची धावपळ, दगदग त्यातच पदरी आलेले अपयश यामुळे पराभूत उमेदवारांनी शुक्रवारी दुपारी १२ वाजेनंतर झोप घेतली. काहींना हा बहाणा वाटला खरा; पण अनेक पराभूतांनी झोपेला जवळ केले होते. काहींना त्यांच्या नातेवाइकांनी झोपी घातले.
पराभूत वेगळ्या कारणांनी झोपले असे वाटत असतानाच विजयी नगरसेवकही शुक्रवारी दुपारी झोपेतच होते. त्यामुळे शुक्रवार हा निवडणुकीत भाग घेतलेल्या अनेकांसाठी झोपेचाच दिवस ठरला.
गुरुवारी दुपारीच मतमोजणी पूर्ण झाली. त्यानंतर विजयी झालेल्यांना मिरवणूक तसेच अनेकांच्या भेटीगाठींमुळे झोपण्यासाठी रात्र झाली. तशीच परिस्थिती पराभूत झालेल्यांचीही होती. पराभूत झालेले उमेदवार मतमोजणी केंद्रावरून घरी परतताना अनेकांनी पाहिले. त्यानंतर ते गायब असल्याचे प्रत्यक्षदर्शी दिसत असले तरी विजयी उमेदवारांसारखीच गर्दी त्यांच्याकडेही होती. भेटीगाठी उरकण्यात त्यांचीही रात्रच झाली.

अनेक जण विजयी तसेच पराभूत उमेदवारांना भेटण्यासाठी शुक्रवारी दुपारी जेव्हा या उमेदवारांच्या घरी पोहोचले तेव्हा बहुतांश उमेदवार झोपेच्या आधीन झाले होते. रात्री उशीर झाला, दगदग अपेक्षेपेक्षा जास्त झाली, अशी कारणे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितली. शुक्रवारी उन्हाचा कडाका तीव्र होता, हे खरे असले तरी बहुतांश उमेदवारांनी दगदग अपेक्षेपेक्षा जास्त झाल्याचे सांगितले. कारण गेल्या पंधरा दिवसांपासून तहान-भूक विसरून ही मंडळी प्रचारात व्यग्र होती.
प्रत्यक्षात प्रचाराची वेळ रात्री १० वाजता संपत असली तरी तो रात्री वाजेपर्यंत चालत होता. ते वाजता झोपल्यानंतर पहाटे पुन्हा वाजता प्रचारासाठी रेडी राहणे उमेदवारांना बंधनकारक होते. त्यामुळे या दिवसांत त्यांच्या स्वत:च्या आरोग्याकडे एका अर्थाने दुर्लक्षच झाले होते. त्यामुळे गुरुवारी काय लागायचा तो निकाल लागला. त्यानंतर शुक्रवारी कुटुंबीय तसेच नातेवाइकांच्या आग्रहास्तव ही मंडळी आराम करत होती. सायंकाळी वाजेनंतरच यातील काही जण उपलब्ध झाले, तर काहींचे मोबाइल सायंकाळी उशिरापर्यंत बंदच होते.