आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच दिवस राहणार कडाक्याची थंडी,पावसाची शक्यता कशामुळे?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आैरंगाबाद - पावसाचीस्थिती काहीअंशी निवळली आहे. पुढील पाच दिवस कडाक्याची थंडी राहणार आहे. त्यानंतर थंडीचा जोर कमी होईल. पाऊस पडण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. रविवारी किमान तापमान १७.० अंशांवर होते. सोमवारी आकाश निरभ्र होते. गारव्यात वाढ झाली होती. परिणामी ५.२ अंश सेल्सियसने तापमानात घट होऊन ते ११.८ अंशांवर खाली घसरले. थंडीचा जोर वाढल्याने यंदाच्या हिवाळ्यात प्रथमच शेकोट्या पेटल्या आहेत.
मराठवाड्यातही थंडीचा जोर वाढला आहे. राज्यात नाशिकचे किमान तापमान (६.३ अंश सेल्सियस) सर्वात कमी असल्याची नोंद कुलाबा वेधशाळेने केली आहे. त्यानंतर मालेगाव ९.०, अहमदनगर १०.२, पुणे ११.४, औरंगाबाद ११.८, जळगाव १२.८, मुंबई १२, नांदेड, अमरावती, अकोला १५.६, रत्नागिरी, सांगली, सातारा १७.५ अंश सेल्सियस तापमान होते.
थंड वाऱ्याचा परिणाम
- पावसाचीस्थिती निवळली आहे. थंड वारे वाहत असल्याने पुढील पाच दिवस थंडी जाणवेल. त्यानंतर थंडीचा जोर ओसरण्यास सुरुवात होईल. हवामानात वेगाने बदल होत आहेत. त्यामुळे पुढे थंडी कशी राहील हे सांगणे कठीण आहे. -पंढरीनाथसाळवे पाटील, सहायकहवामान शास्त्रज्ञ, चिकलठाणा वेधशाळा.

हवेचा दाब कमी होत आहे. त्यामुळे पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता वाढली आहे. मध्य महाराष्ट्रात हवेचा वेग हजार १२ हेप्टा पास्कल इतर ठिकाणी हजार १० हेप्टा पासकल हवेचा दाब आहे. वारे आणि समुद्रावरून बाष्प घेऊन येणारे वारे यांचे मिलन होऊन थंड स्थिती निर्माण होत आहे. हिंदी महासागराच्या पाण्याचे तापमान वाढत आहे. यामुळे देखील पाऊस पडण्याची चिन्हे वाढत आहेत. त्यामध्ये बदलही होऊ शकतो. मात्र थंडीचा जोर फारसा वाढणार नाही. उलट तो या बदलामुळे कमी होईल, अशी माहिती हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी दिली.