आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थंडीच्या लाटेने शहर गारठले!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - थंडीच्या लाटेने सध्या शहर गारठले आहे. शनिवारी पहिल्यांदाच किमान तापमान 10 अंशांपर्यंत खाली आले. थंडीमुळे सायंकाळी 6 वाजेनंतर बाजारेपठेतील गर्दी कमी होत आहे.

फायलिन, हेलेन आणि लेहर चक्रीवादळामुळे औरंगाबादसह राज्यात अनेक ठिकाणी उष्ण, दमट वातावरण तयार झाले व जोरदार अवकाळी पाऊस कोसळला. वातावरणातील अनपेक्षित बदलांमुळे 25 नोव्हेंबरला किमान तापमान 20.9 अंशांवर पोहोचले. 2 डिसेंबरला 18.6 अंशांवर असलेले तापमान 6 डिसेंबरला 6 अंशांनी घसरून 14 अंशांपर्यंत खाली आले, तर शनिवारी त्यामध्ये आणखी 4 अंशांनी घसरण होऊन तापमान 10 अंशांवर होते. डिसेंबरअखेरपर्यंत तापमान नीचांकी पातळी गाठण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली.