आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पश्चिम, उत्तरेकडून येणा-या वा-यांनी वाढली थंडी, तापमान8.8

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - भूमध्य समुद्राकडून येणा-या थंडगार वा-यांनी पश्चिम भारतात तापमान खाली आणले असून त्याचा कडाका औरंगाबादेत जाणवत आहे. गुरुवारी औरंगाबाद शहराचे किमान तापमान 8.8 अंशांपर्यंत घसरले तर राज्यात नांदेड येथे सर्वात कमी म्हणजे 5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. किमान आठवडाभर थंडीचा कडाका कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
गुरुवारी दिवसभर ऊन असूनदेखील थंड वारे सुटल्याने मराठवाड्यासाठी आजचा दिवस हुडहुडी भरणारा ठरला आहे. अनेकांनी सकाळपासून अंगावर चढवलेले स्वेटर्स, कानटोप्या रात्रीही कायम ठेवल्या. दिवसभर वाहणारे थंडगार वारे महिला, वृद्ध, लहान मुलांसाठी त्रासदायकच होते. अचानक घसरलेले तापमान आणि वाढलेल्या बोच-या थंडीमुळे अनेकांचे हाल झाले.
राज्यात बुधवारी नांदेड येथे सर्वात कमी म्हणजे 5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर नगर येथे 6.6, औरंगाबादचे तापमान 8.8 अंशांपर्यंत घसरले.
पुण्याचे तापमान 9.6 अंश सेल्सिअस एवढे होते. ही अचानक वाढलेली थंडी पश्चिम समुद्रावरून येत असलेले थंड वारे आणि उत्तरेकडे सुरू असलेल्या बर्फवृष्टीमुळे वाढल्याचे पुणे व नागपूर वेधशाळेच्या हवामान तज्ज्ञांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.
24 तासांत 3 अंशाने घट - औरंगाबाद शहराच्या किमान तापमानात 19 जानेवारी (किमान 11.6) बुधवारच्या तुलनेत 3 अंश सेल्सिअस अंशाने घसरण झाली आहे. 20 जानेवारी गुरुवारी 8.8 अंश सेल्सिअसवर घसरण झाली आहे. उत्तरेकडून येणा-या वा-यामुळे राज्यात सर्वत्र थंडीची लाट पसरली आहे. गेल्या आठवडाभर सर्वत्र थंडीने नवनवीन उच्चांक करीत सरासरी तापमानापेक्षा दोन ते पाच अंशांनी घट नोंदविली आहे.