आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्रायडे रिलीज: औरंगाबादेत कडक बंदोबस्तात ‘विश्वरूपम’!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- कमल हसन यांचा बहुचर्चित ‘विश्वरूपम’ हा चित्रपट शहरातील चित्रपटगृहांमध्ये शुक्रवारी पोलिस बंदोबस्तात प्रदर्शित झाला. ज्या चित्रपटामुळे हसन देश सोडायला तयार झाले त्यात नेमके काय आहे, हे जाणून घेण्यासाठी शहरातील सर्वधर्मीय प्रेक्षकांनी थिएटरवर गर्दी के ली होती.

या चित्रपटातील काही दृश्यांना मुस्लिम समुदायाने आक्षेप घेतल्यामुळे तामिळनाडू राज्य सरकारने त्याच्या प्रदर्शनावर बंदी घातली होती. हे प्रकरण उच्च न्यायालयातही गेले होते. कमल हसन यांनी मुस्लिम प्रतिनिधींशी चर्चा करून काही दृश्यांना कात्री लावण्याची तयारी दर्शवल्यावर प्रदर्शनाची परवानगी मिळाली. त्यामुळे चित्रपटावरून चांगलाच गदारोळ माजला होता. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरही भरपूर चर्चा झाली. राजकारणही जोरदार झाले.

आंतरराष्ट्रीय दहशतवादावर बेतलेल्या या चित्रपटात पूजा कुमार, राहुल बोस, जयदीप अहलावत आणि अँड्रेआ जेरेमी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. शंकर-एहसान-लॉय यांचे संगीत, अभिनय आणि दिग्दर्शन अत्युच्च दर्जाचे असल्याचे ‘फस्र्ट डे, फस्र्ट शो’वाल्या प्रेक्षकांनी सांगितले.

कथानक : चेन्नईतील निरुपमा शिक्षणासाठी न्यूयॉर्कला जाते. तिथे विश्वनाथ नावाच्या नृत्य शिक्षकाशी तिची ओळख होते. पुढे या ओळखीचे रूपांतर प्रेमात आणि नंतर लग्नात होते. लग्नानंतर निरुपमाला पीएचडी करण्याच्या कारणावरून त्यांच्यात टोकाचे वाद होतात. निरुपमाला विश्वनाथपासून घटस्फोट घ्यायचा असतो. मात्र, अमेरिकन कायद्यानुसार त्यासाठी तिला पुरावे सादर करावे लागणार असतात. पुरावे जमा करण्यासाठी ती एका खासगी गुप्तहेराची नेमणूक करते. यानंतर चित्रपटाला रहस्यमय कलाटणी मिळते. विश्वनाथ हा हिंदू नसून मुस्लिम आहे हे कळते. ओमर हा त्याचा बॉस न्यूयॉर्क शहर नेस्तनाबूत करण्यासाठी पेटून उठलेला असतो. मात्र, विश्वनाथला हे मान्य नसल्याने तो बाहेर पडतो. शेवटी ओमर विश्वनाथला शोधतो आणि न्यूयॉर्क शहर उडवतो का, याची ही कथा आहे.

अफलातून
हा चित्रपट प्रत्येकाने पाहावा असा आहे. अतिशय अफलातून कथानक आहे.
-कुणाल स्वामी, प्रेक्षक

चित्रपट जबरदस्त
चित्रपटातील डान्स सिक्वेन्स, प्रेम, अँक्शन सगळे काही हॉलीवूडच्या दर्जाचे आहे. जबरदस्त चित्रपट आहे.
-राम वजिरे, प्रेक्षक

पैसा वसूल
अतिशय उत्तम कथानक, जोडीला कमल हासनचा जबरदस्त अभिनय अशी उत्तम भट्टी चित्रपटात जमून आली आहे.
-सतीश भेंडेकर, प्रेक्षक

सर्वांनी पाहण्यासारखा
चित्रपट प्रत्येकाने पाहावा असा आहे. कुठेही जातीय भावना दुखावेल, असे नाही. संगीत, दिग्दर्शन, अभिनय, कथानक सर्वच उत्तम आहेत.
-चंद्रशेखर मणियार, प्रेक्षक