आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Within 15 Minutes Congress Change Its Election Candidate

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक: 15 मिनिटांत बदलला काँग्रेसचा उमेदवार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत विद्यमान आमदार किशनचंद तनवाणी यांच्या विरोधात काँग्रेसकडून अंबडचे माजी नगराध्यक्ष बाबुराव कुलकर्णी यांच्या नावावर बुधवारी रात्री शिक्कामोर्तब झाले. सकाळी ते अर्ज दाखल करणार असल्याचे प्रदेश सरचिटणीस अरुण मुगदिया आणि जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे यांनी सांगितले. मात्र, गुरुवारी दुपारी 12 वाजता सूत्रे हलली आणि 15 मिनिटांत काँग्रेसचा उमेदवार बदलला. गतवेळी काँग्रेसला पराभूत करणारे सुभाष झांबड काँग्रेसचे उमेदवार झाले.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी कुलकर्णी, तर माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी प्रमोद राठोड यांच्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली होती. झांबड यांना मुगदिया आणि औताडे यांनी साथ दिली.

काँग्रेस पदाधिकारी व राष्ट्रवादीचे कदीर मौलाना यांच्या उपस्थितीत 2.20 वाजता झांबड यांनी उमेदवारी दाखल केली. त्याच वेळी राष्ट्रवादीतर्फे अभिजित देशमुख, मनमोहनसिंग ओबेरॉय यांनी, तर काँग्रेसतर्फे फिरोज पटेल, देवयानी कृष्णा पाटील यांनी उमेदवारी दाखल करून पक्षात आलबेल नसल्याचे दाखवून दिले.