आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीबीएसईच्या नावाखाली फसवणुकीचा आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- सीबीएसईची मान्यता नसतानाही मान्यता असल्याचे सांगून पालकांची आर्थिक लूट करण्याबरोबरच विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन फसवणूक करण्यात येत आहे. अशा शाळांवर कारवाई करण्याची मागणी पालकांनी शिक्षण उपसंचालक सुधाकर बानाटे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शाळेला सीबीएसईची मान्यता आहे असे भासवून शहरातील इंडस शाळेने सीबीएसईच्या वर्गांत मुलांना प्रवेश दिले. ही शाळा पहिली ते आठवीपर्यंत आहे. आठवीपर्यंतची फीदेखील घेण्यात येते. वर्षाला लाख रुपये फी घेणाऱ्या या शाळेला सीबीएसईचीच काय शिक्षण विभागाचीही मान्यता नाही. ही माहिती समोर येताच पालकांना धक्का बसला. एवढेच नाही, तर आठवीच्या वर्गात टीसी घेऊन जा असेदेखील पालकांना सांगण्यात येत आहे. मान्यताच नाही तर मग आतापर्यंत मुलांना प्रवेश का दिले ? अशा जवळपास साडेतीनशे मुलांचे भविष्य या प्रकारामुळे टांगणीला लागले आहे. पालकांनी एकत्र येत, विद्यार्थी आणि पालकांची लूट करणाऱ्या अशा शाळांवर कारवाईची मागणी करणारे निवेदन आज शिक्षणाधिकारी नितीन उपासनी आणि शिक्षण उपसंचालक सुधाकर बानाटे यांना दिले. निवेदनावर शीतल काळुंखे, हेमंत पाचुरकर, विशाल पाटील, सचिन परळकर, प्रफुल्ल वाकळे, अजय पाटील, सी. जी. धवलशंख, सुनील शिंदे, प्रज्ञा मुंडे, नीता देशमाने, रवींद्र सिंग, संतोष काळुंखे, संजय इंगळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. यासंबंधी शाळेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही.

शाळांवर शिक्षण विभागाने कारवाई करावी

मान्यता नसतानाही शाळा पालकांची आणि विद्यार्थ्यांची फसवणूक करत आहेत. कोणतेही नियम पाळले जात नाहीत. अशा शाळांवर शिक्षण विभागाने कडक कारवाई करायला हवी.
-उदय सोनवणे, पालक
बातम्या आणखी आहेत...