आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खडू आणि फळा जागेवरच, पगार मिळतोय मात्र वेळेवर!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेगवेगळ्या कारणांमुळे विद्यार्थ्यांनी शाळा सोडली… कुणी शेजारी असलेल्या गावातील शाळेत गेले तर कुणी कायमचीच बुट्टी मारली! विद्यार्थी संख्या शून्यावर आली. एकही विद्यार्थी नसला तरीही शिक्षण विभागाने मात्र या शाळांमधील शिक्षकांना इतरत्र हलवले नाही. जिल्हा परिषदेच्या या शाळा बंद पडून आता १० महिने होत आले, तरीही शिक्षक मात्र तेथेच असून बसून पगार घेत आहेत.

जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडत आहेत. कधी खासगी संस्थाचालक विद्यार्थी पळवतात, तर कधी जिल्हा परिषदेच्या अनास्थेने विद्यार्थ्यांना शाळा बदलावी लागते. चालू शैक्षणिक वर्षात औरंगाबाद तालुक्यातील शाळांची पटसंख्या शून्यावर आली. यात कचनेर केंद्रातील तांडा क्रमांक तीन, लाडसावंगी केंद्रातील रामेश्वरवाडी आणि चौका केंद्रातील टिका वस्ती या तीन शाळांचा समावेश आहे. या तिन्ही शाळांच्या परिसरात ऊसतोड मजुरांची संख्या खूप आहे. दरवर्षी अख्खे कुटुंब ऊसतोडणीसाठी हंगामी स्थलांतर करतात. यात शाळकरी मुलांनाही पालक आपल्यासोबत ऊसतोडणीसाठी घेऊन जातात. परिणामी, शाळांमधील विद्यार्थी संख्या घटत गेली. तसेच या शाळांच्या परिसरातच खासगी शाळाही असल्याने काही विद्यार्थ्यांनी खासगी शाळांमध्ये प्रवेश घेतला. हळूहळू या तिन्ही शाळांमधील सर्वच विद्यार्थ्यांनी शाळेतून दाखला काढला अन् शाळा बंद पडल्या.

समायोजन केले नाही
जिल्हापरिषदेची एखादी शाळा बंद पडल्यास तेथील शिक्षकांचे इतरत्र समायोजन करणे गरजेचे होते. ती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचीच जबाबदारी आहे. औरंगाबाद तालुक्यात सात शाळांमध्ये शिक्षकांच्या १२ जागा रिक्त आहेत. असे असतानाही बंद पडलेल्या शाळांमधील शिक्षकांचे अजूनही इतर शाळांमध्ये समायोजन झालेले नाही. त्यामुळे त्यांना बसूनच फुकटचा पगार दिला जात आहे.

दोन-दोन शिक्षक कार्यरत
प्राथमिकवर्गांसाठी ते २२ विद्यार्थ्यांची एक तुकडी असते. एका तुकडीसाठी दोन शिक्षक मंजूर आहेत. त्यानुसार या तिन्ही शाळांमध्ये प्रत्येकी दोन-दोन शिक्षक आजही आहेत.

>चालू शैक्षणिक वर्षातच आमच्या शाळा बंद झाल्या आहेत. याला साधारण: दहा महिने होत आले. अजून आमचे अधिकृतरीत्या दुसऱ्या शाळांमध्ये समायोजन झालेले नाही. बंदपडलेल्या शाळांमधील शिक्षक

>विद्यार्थ्यांअभावीऔरंगाबाद तालुक्यात तीन शाळा बंद पडल्या. येथील काही शिक्षकांना आजूबाजूच्या शाळांमध्ये शिकविण्याबाबत तोंडी आदेश दिलेले आहेत. हे काम त्यांनी करायला हवे. मात्र, समायोेजनाबाबत आताच काही सांगता येणार नाही. राकेश साळुंखे, गट शिक्षणाधिकारी
>पटसंख्याशून्यावर आलेल्या शाळांमधील शिक्षकांचे समायोजन केलेले आहे. काही शाळांतील शिक्षकांचे समायोजन बाकी असू शकते. याबाबत गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेण्यात येईल. एन.के. देशमुख, उपशिक्षणाधिकारी(प्रा.)