आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजेच्या धक्क्याने महिलेचा बळी; संतप्त नागरिकांचे ठिय्या आंदोलन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- परिसरातील लोंबकळणाऱ्या वीज तारा, वीज खांबांमध्ये उतरणारा विद्युत प्रवाह, तारांचे झालेले जाळे याबाबत महावितरणकडे अनेकदा तोंडी तक्रारी करूनही यंत्रणेचे दुर्लक्ष झाल्याने शहरातील अंकुशनगर भागात सोमवारी सकाळी महिलेचा वीज खांबाला चिकटून मृत्यू झाला. यानंतर संतप्त नागरिकांनी वीज कार्यालयासमोर ठिय्या मांडत अभियंत्यांना घेराव घातला.

शहरातील अंकुशनगर भागात वीज वितरण व्यवस्थेचा सावळा गोंधळ सुरू आहे. परिसरात विद्युत तारांचे जाळे झाले असून काही ठिकाणी तर तारा लोंबकळत जमिनीला टेकण्याची वेळ आली आहे. याबाबत अंकुशनगर भागातील रहिवाशांनी अनेकदा महावितरणच्या कार्यालयाकडे तोंडी तक्रारी केल्या होत्या, परंतु अधिकाऱ्यांना मात्र या तक्रारींची दखल घेण्यास वेळ मिळालाच नाही. अशातच सोमवारी सकाळी सुरसाबाई भगवान माने (५०) या महिलेचा विजेच्या खांबाजवळील विद्युत प्रवाह उतरलेल्या ताणाच्या तारेला चिकटून मृत्यू झाला. मृत सुरसाबाई भगवान माने या बीड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामध्ये मैल कामगार म्हणून कार्यरत होत्या.

अशीझाली घटना
सोमवारीसकाळी साडेनऊच्या सुमारास सुरसाबाई माने या आपल्या गल्लीतून जात असताना त्यांनी सहज विजेच्या खांबाला आधार म्हणून लावलेल्या ताणाच्या तारेला हात लावला. खांबामध्ये वीजप्रवाह उतरलेला असल्याने विजेचा धक्का लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. शिवाजीनगर ठाण्यात याप्रकरणी नोंद करण्यात आली आहे.

खांबात प्रवाह उतरला
महावितरणचेसहायक अभियंता प्रदीप मिसाळ यांच्या म्हणण्यानुसार, नगरपालिकेच्या वतीने वीज खांबावर लावलेल्या पथदिव्याचे वायर कट झाले होते. वाऱ्याने तो पथदिवा फिरून त्याचा तारेला स्पर्श झाला. त्यामुळे खांबात विद्युत प्रवाह उतरला अन‌् सुरसाबाईंनी त्याला हात लावल्याने विजेच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला.

नागरिकांनी मांडला ठिय्या
विद्युततारा खांबाची दुरुस्ती करण्याबाबत वेळोवेळी माहिती देऊनही अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने एका महिलेला जीव गमावण्याची वेळ आली, असा आरोप करत संतप्त नागरिकांनी महावितरणच्या अंकुशनगर येथील कार्यालयासमोर ठिय्या मांडत आंदोलन केले. या वेळी महावितरणच्या कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. वैभव गुट्टे, आकाश सोनवणे, शंतनू ूडाके, सूरज शेळके, गणेश जाधव, विवेक कुडके यांच्यासह परिसरातील नगरसेवक, नागरिक याठिकाणी उपस्थित होते.

अभियंत्यांना घेराव
परिस्थितीचीपाहणी करण्यासाठी आलेले महावितरणचे सहायक अभियंता प्रदीप मिसाळ यांना नागरिकांनी घेराव घालत चांगलेच खडे बोल सुनावले. तसेच आतातरी अंकुशनगर भागातील वीज समस्या सोडवाव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे त्यांना केली. अभियंता मिसाळ यांनी तत्काळ विद्युत तारांची दुरुस्ती करण्याचे लेखी आश्वासन दिले.

शेळ्यांचा मृत्यू
अंकुशनगरयेथील कपिलमुनी मंदिर परिसरात चार दिवसांपूर्वीच विजेच्या धक्क्याने काही शेळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याचे नागरिकांनी सांगितले. यानंतर नागरिकांनी लोंबकळणाऱ्या वीज तारा, खांबांमध्ये उतरणारा विद्युुुत प्रवाह याबाबत तोंडी तक्रारी केल्या होत्या.

पोलिसांचा बंदोबस्त : घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर ठाण्याचे पोलिस निरीक्षक उमेश कस्तुरे यांनी ताफ्यासह घटनास्थळी धाव घेत पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. संतप्त नागरिकांनी महावितरणच्या कार्यालयासमोर ठिय्या मांडल्यानंतर पोलिसांनी सुरक्षा वाढवली होती. घटनास्थळीही जाऊन निरीक्षक कस्तुरे, अभियंता मिसाळ, कसबे यांनी पाहणी केली.

दखल घेतली नाही
तक्रारींची वेळीच दखल घेतली असती तर आज एका महिलेला जीव गमावण्याची वेळ आली नसती. वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्यामुळे बळी गेला आहे. -वैभवगुट्टे,रहिवासी, अंकुशनगर

दुरुस्ती करू
परिसरातील सर्व विद्युत व्यवस्थेच्या दुरुस्तीचे काम करण्यात येईल. अंकुशनगर परिसरताील नागरिकांनी याबाबत निवेदन दिले आहे. लवकरच दुुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. -प्रदीपमिसाळ, सहायक अभियंता
बातम्या आणखी आहेत...