आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Woman Contest News In Marathi, Divya Marathi, Woman Day

वुमन्स डे काँटेस्टचा आज शेवटचा दिवस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - ‘दिव्य मराठी’तर्फे महिला दिनानिमित्त आयोजित तीन स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचा बुधवारी अखेरचा दिवस आहे. ‘दिव्य मराठी’च्या या स्पध्रेतून पाच प्रेरणादायी महिलांसाठी स्पर्धा, महिला फोटोग्राफी स्पर्धा तसेच सवरेत्कृष्ट संदेश स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यात सहभागी होऊन स्पर्धक हजारो रुपयांचे आकर्षक पुरस्कार जिंकू शकतात.


‘श्रेष्ठ पाच प्रेरणादायी महिला’ या स्पध्रेत सहभागी होण्यासाठी देश-विदेशातील अशा पाच महिलांची नावे divyamarathi.com वर पाठवावी लागतील, ज्यांना तुम्ही प्रेरणादायी महिला म्हणता, त्यांची नावे स्पर्धकांच्या यादीतील पाच नावांशी जुळली व त्याला सर्वाधिक मते मिळाली तर विजेता म्हणून तुम्हाला पुरस्कार मिळतील.
महिला फोटोग्राफी स्पध्रेत स्पर्धक त्यांनी काढलेली छायाचित्रे दोन श्रेणीत पाठवू शकतील. पहिली श्रेणी कॉस्च्यूम म्हणजे पारंपरिक, वेस्टर्न, ब्राइडल आदी प्रकार तर दुसर्‍या श्रेणीत सेलिब्रेशन म्हणजे विवाह सोहळा, जन्मदिन, किटी पार्टी आदी श्रेणीत छायाचित्रे पाठवता येतील. त्याचबरोबर सर्वश्रेष्ठ संदेश स्पध्रेत भाग घेण्यासाठी कोणत्याही स्पर्धकाला महिला दिनावर आधारित संदेश पाठवावे लागतील. त्यातून पाच विजेते निवडले जातील. या स्पध्रेत भाग कसा घ्यायचा याची माहिती ‘दिव्य मराठी’च्या अंकातील जाहिरातीद्वारे मिळू शकेल.