आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Woman Cricket News In Marathi, Rich Verma, Divya Marathi, Player

तिची लढाई: महिला क्रिकेटपटू घडवण्यासाठी धडपडणारी रिचा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - प्रत्येक भारतीयाच्या नसानसांत क्रिकेट सामावलेले आहे. पण परुषांच्या क्रिकेट एवढी प्रसिद्धी महिला क्रिकेटला अद्याप तरी मिळालेली नाही. त्यामुळे महिला क्रिकेटपटूंची दखल घेतली जावी. तसेच शहरातील उदयोन्मुख महिला खेळाडूंना या क्षेत्रात पारंगत करावे यासाठी रिचा वर्मा सातत्याने झटत आहे.


रिचा मूळ नागपूरची. सध्या विवेकानंद महाविद्यालयात ती बी.एस्सीच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे. रिचा नववीत असताना तिने युवराज सिंगला क्रिकेट खेळताना पाहिले आणि तेव्हापासून ती क्रिकेटची चाहती बनली. त्यानंतर शाळेत हँडबॉल, बास्केटबॉलच्या जोडीने तिने क्रिकेट खेळायलाही सुरुवात केली. शालेय जीवनापासून रिचाला क्रिकेटबद्दल विशेष ओढ वाटायची. त्यानंतर आंतरशालेय आणि इतरत्र वेगवेगळ्या स्पर्धा खेळताना या क्षेत्रातच करिअर करण्याचे ध्येय रिचाने निश्चित केले. त्यादृष्टीने आवश्यक अशा विविध क्रिकेट कॅम्पमध्ये ती सहभागी झाली. शालेय जीवनानंतरही रिचाने आपली आवड जोपासली.

सहकारी प्रमोद उघाडे यांच्याकडून त्याचे रीतसर प्रशिक्षण घेतले. बॅटिंगची विशेष आवड असणारी रिचा लेगस्पिनर आहे. महाविद्यालयीन काळातही रिचाने आंतरमहाविद्यालयीन, आंतरविद्यापीठ स्पर्धांमध्ये सहभागी होत महाविद्यालयाला, विद्यापीठाला अनेक पारितोषिके मिळवून दिली. रिचाला क्रिकेट संदर्भातील विशेष कौटुंबिक पार्श्वभूमी नाही. वडील सत्येंद्रसुद्धा क्रिकेट खेळायचे मात्र केवळ आवड म्हणून. पण रिचाची क्रिकेटची ही आवड त्यांनी जाणीवपूर्वक जोपासली पाठिंबा देऊन वाढवलीसुद्धा. रिचानेसुद्धा कुटुंबाने दाखवलेल्या विश्वासाला सार्थ ठरवत उत्तम कामगिरी केली. उदयोन्मुख खेळाडूंना तंत्रशुद्ध प्रशिक्षण मिळावे यासाठी उघाडे यांच्यासोबत शहरात युवराज क्रिकेट अकॅडमीची स्थापना तिने केली आहे. या माध्यमातून 5 ते 13 वयोगटातील मुला-मुलींना प्रशिक्षण दिले जाते. उन्हाळी सुट्यांमध्ये कॅम्पचे आयोजनही केले जाते. महिला प्रशिक्षक असूनही क्रिकेट शिकण्यासाठी मुलींचा म्हणावा तेवढा प्रतिसाद मिळत नसल्याची खंत रिचाने व्यक्त केली.


समाजजागृतीची गरज
महिलासुद्धा पुरुषांइतके उत्तम क्रिकेट खेळू शकतात. पुरुष संघाचा उदो-उदो होत असताना महिला क्रिकेटरकडे मात्र दुर्लक्ष केले जाते. ही परिस्थिती बदलण्यासाठी समाजजागृती आवश्यक आहे. रिचा वर्मा, क्रिकेट प्रशिक्षक.