आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेम्पोच्या धडकेत महिलेचा अंत, रस्ता ओलांडतांना घडला प्रकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज - बसमधून उतरून रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात असलेल्या महिलेला भरधाव टेम्पोने धडक दिली. यात त्या महिलेचा अंत झाला. ही घटना गरवारे कंपनीच्या गेटसमोर शनिवारी सकाळी ११.३० च्या सुमारास घडली. लक्ष्मीबाई राधाजी पाचपुते (६०, रा. गळनिंब, ता. गंगापूर) असे मृत महिलेचे नाव आहे. नायगाव येथे मुलीला भेटण्यासाठी आलेल्या लक्ष्मीबाई गरवारे कंपनीच्या गेटसमोर बसमधून उतरल्या. नायगावकडे जाण्यासाठी त्या महामार्ग ओलांडत असताना त्यांना टेम्पोने (एमएच ११ एएल १०१५) ठोकरले. त्यांना घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. वाळूज पोलिसांनी टेम्पाेचालक मुलानी शब्बीर इनायत उल्ला (३६) याला अटक केली आहे.