आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्यावर झाली प्रसुती, मदतीविना 9 तास तडफडत सोडला जीव, मृतदेह सोडून नवरा फरार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद रेल्वे स्टेशनच्या वाहनतळाशेजारी शाहिनला घेऊन बसलेला पती. - Divya Marathi
औरंगाबाद रेल्वे स्टेशनच्या वाहनतळाशेजारी शाहिनला घेऊन बसलेला पती.
औरंगाबाद - चिमुकल्याला रस्त्यावरच जन्म देणाऱ्या महिलेचा मदतीविना मृत्यू झाल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना बुधवारी रेल्वेस्थानक परिसरात घडली. पहाटे पाच वाजता एका चिमुकल्याला जग दाखवणाऱ्या या महिलेने असह्य वेदना अन् प्रचंड रक्तस्रावामुळे दुपारी तीन वाजता तडफडून प्राण सोडला. अखंड वर्दळ असणाऱ्या या भागातील अशी घटना घडूनही मदतीसाठी कुणीच हात पुढे केला नाही, हे विशेष. शेख शाहिन शेख रफिक (२५, निझामाबाद, आंध्र प्रदेश) असे त्या दुर्दैवी महिलेचे नाव आहे. यापूर्वी परिसरात कधीच न आढळलेली शाहिन, तिचा पती आणि कुटुंबीय मंगळवारी रात्रभर रेल्वेस्थानक परिसरात होते.
बुधवारी पहाटे प्रसूतिवेदना सुरू झाल्या. पाच वाजता एका गोंडस मुलाला तिने जन्म दिला. यानंतर रक्तस्राव आणि असह्य वेदनांमुळे तळमळणारी शाहिन बराच वेळ मदतीसाठी आर्जवं करत होती. दुपारी तीनच्या सुमारास क्रांती चौक चार्लीचे पथक नियमित गस्तीसाठी रेल्वेस्थानक परिसरात दाखल झाले. रेल्वेस्थानकावरील वाहनतळाच्या बाजूला एक जण कुमारवयीन मुलीला कुशीत घेऊन बसल्याचे दृश्य त्यांना दिसले. पथकातील नितीन घोडके, दिनेश भुरेवाल, शुभम भालेराव कल्याण निकम यांनी त्यांची विचारपूस केली. घडलेला प्रकार कळताच त्वरित कंट्रोल रूमला माहिती देण्यात आली. घटनास्थळी दाखल झालेल्या १०८ रुग्णवाहिकेतील डॉक्टरांनी शाहिनला मृत घोषित केले.
पुढील स्लाईडवर वाचा, बायकोचा मृतदेह सोडून नवऱ्याचा पोबारा..... रेल्वे स्टेशन परिसरातील लोकांचे सोईस्कर दुर्लक्ष.... अवघ्या दहा तासांचे बाळ आईच्या प्रेमाला पारखे...