आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Woman Harassment, All In Law Family Member Arrested

महिलेचा छळ केल्या प्रकरणी सासरच्या मंडळींविरुध्‍द गुन्हा दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद | लग्नानंतर सहा महिन्यांनी 'तू आम्हाला पसंत नाहीस,' असे कारण सांगत महिलेचा छळ करणाऱ्या सासरच्या मंडळींविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे.
पीडित महिलेचा २००२ मध्ये राहुल बुबने याच्याशी विवाह झाला होता. लग्नानंतर सासू-सासरे, नवरा आणि दीर या चौघांनी तिचा छळ करण्यास सुरुवात केली. तिला शिवीगाळ करत मारहाण केली जात होती. व्हिडिओ तयार करून बदनामी करू, चाकूचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी विवाहितेला दिली जात होती.
पीडितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन नवऱ्याने दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध प्रस्थापित केले होते. माहेरहून पैसे आण म्हणत सासू-सासरे आणि दीर नेहमी छळ करत असल्याचे पीडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे. नेहमीच्या त्रासाला कंटाळून महिलेने नोव्हेंबर रोजी एमआयडीसी सिडको पोलिस ठाणे गाठून राहुल बुबने, श्रेयांस बुबने (सासरा), अमित बुबने (दीर) आणि सासू (ब्ल्यू बेल, प्लॉट नं. ४०३, एन-१, सिडको) या चौघांविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विद्या रणेर करत आहेत.