आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता महिलांनीच पुढे येण्याची गरज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- महिलेचा छळ आणि नेत्यावर गुन्हे दाखल करण्यास भाग पाडल्याबद्दलचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर नागरिकांनी आपल्या भावना डीबी स्टारकडे व्यक्त केल्या. संवेदनशील विषयाबाबत पोलिस प्रशासन किती गंभीर आहे, याची प्रचिती येते. तक्रार कुणाचीही असो, त्यावर गांभीर्याने तपास करून वस्तुस्थिती समोर आणण्याचे काम पोलिसांनी केले पाहिजे, जेणेकरून तक्रारदारास न्याय मिळेल, असे त्यांनी सांगितले.
देशात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. प्रत्येक राजकीय पक्ष महिलांच्या सुरक्षिततेची हमी देतो. मात्र, असे होताना दिसत नाही. पोलिसांनी आपले कर्तव्य योग्य पद्धतीने पार पाडून या प्रकरणात योग्य दिशेने तपास करण्याची गरज आहे.
संगीता जाधव, भावसिंगपुरा
महिलांसाठी देशात कडक कायदे केले आहेत. न्यायव्यवस्था सामान्यांसाठी असली तरी तपासात दिरंगाई होण्याचे प्रमाण वाढले आहे. कायदे नेमके कुणासाठी आहेत? हे स्पष्ट होण्याची गरज आहे.
-ऊर्मिला सबनीस, एन-5
महिलेने केलेल्या तक्रारीनंतर तपास होत नाही. वरिष्ठ अधिकारी पुढाकर घेतात, पण कनिष्ठ अधिकारी चालढकल करतात, हे अत्यंत चुकीचे आहे. सामाजिक संवेदनशीलताच हरवली आहे.
- अनिता भांगे, श्रीकृष्णनगर
कायद्यातील पळवाटा ज्यांना माहीत आहेत, ते कुणालाच घाबरत नाहीत. अशा परिस्थितीत कठोर पावले उचलून दोषींना कडक शासन होण्याची गरज आहे, जेणेकरून असे कृत्य करणा-यांना जरब बसेल.
-दिनेश कुलकर्णी, लक्ष्मीनगर
सामाजिक बदलाच्या गोष्टी करणारे नेतेच असे कृत्य करायला लागले तर सामान्यांनी कुठे जायचे? काही मस्तवाल नेत्यांमुळे चांगले नेते बदनाम होत आहेत. अशा नेत्यांना पोलिसांनी पाठीशी न घालता त्यांना आवरण्याची गरज आहे.
-भाग्यश्री कदम, हर्सूल