आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाळण्याच्या दोरीने घेतला विवाहितेने गळफास, पती सोबत झाले होते भांडण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाळण्याच्या दोरीने घेतला विवाहितेने गळफास
औरंगाबाद- पती सोबत भांडण झाल्यामुळे रागाच्या भरात २२ वर्षीय विवाहितेने पाळण्याच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना वाळूज, रांजणगावात शुक्रवारी सकाळी दहा वाजता घडली. प्रियंका अतुल पाटील असे या मृत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अतुल आणि प्रियंका रांजणगावातील गवळी यांच्या वाड्यात भाड्याने राहतात. ते जवळच असलेल्या वडगावचे मूळ रहिवासी आहेत. शुक्रवारी अतुलचा भाऊ विनोद याला पाहायला मुलीकडील मंडळी येणार होती. त्यासाठी अतुलला गावी जायचे होते. मात्र, त्याने या कार्यक्रमाला जाऊ नये अशी प्रियंकाची इच्छा होती. प्रियंकाचा विरोध झुगारून तो कार्यक्रमाला गेला म्हणून घरी एकट्याच असलेल्या प्रियंकाने बाळासाठी बांधलेल्या पाळण्याच्या दोरीने गळफास घेतला.
काही वेळाने शेजारच्या व्यक्तीच्या निदर्शनास ही बाब आली, तिने तत्काळ अतुलला फोनद्वारे माहिती दिली. अतुल घरी येताच त्याने बेशुद्ध असलेल्या प्रियंकाला घाटीत दाखल केले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याची एमआयडीसी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली.