आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीवर अत्याचार; आरोपीला सक्तमजुरी- अंबाजोगाईच्या सत्र न्यायालयाचा निकाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंबाजाेगाई- अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेत अत्याचार केल्याप्रकरणी मोरेवाडी येथील ऑटोचालकास दोषी ठरवत दहा वर्षे सक्तमजुरी साडेचार हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस.व्ही.हंडे यांनी सोमवारी ही शिक्षा सुनावली.

शहराजवळील मोरेवाडी येथील देवानंद राजाभाऊ मोरे (२२) या ऑटोचालकाने गावातीलच नववीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला चनई येथील विद्यालयासमोरून १० ऑक्टोबर २०१३ रोजी लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले होते. याप्रकरणी शहर ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. पोलिस उपनिरीक्षक सतीश बनसोडे यांनी पीडित मुलगी आणि आरोपीला मुंबई येथून ताब्यात घेतले. यानंतर बलात्काराची तक्रारही नोंदवण्यात आली होती. प्रकरणाची सुनावणी अंबाजोगाई सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस.व्ही. हंडे यांच्यासमोर झाली.
याप्रकरणी अंबाजोगाई सत्र न्यायालयात एकूण नऊ साक्षीदार तपासण्यात आले.

मुलीवरील अत्याचाराचा वैद्यकीय अहवाल सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने देवानंद मोरे याला विविध कलमांसह बाललैंगिक अत्याचारप्रकरणी दोषी ठरवत दहा वर्षे सक्तमजुरी साडेचार हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षाच्या वतीने अॅड. लक्ष्मण फड यांनी काम पाहिले.
बातम्या आणखी आहेत...