आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पन्नासाव्या वर्षी केली सीएस परीक्षा उत्तीर्ण, ध्येयवेड्या महिलेची शिक्षणासाठी धडपड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - एकोणतीस वर्षे संसार,नोकरी सांभाळत चार विविध पदव्या प्राप्त करत वयाच्या पन्नासाव्या वर्षी कंपनी सेक्रेटरी ही अवघड मानली जाणारी परीक्षा उत्तीर्ण केली. अशा या जिद्दी महिलेचे नाव आहे. राजश्री वसेकर (पैठणकर)बी. कॉम. एमकॉम, एलएलबीनंतर सीएस अशा चार पदव्या नोकरी करत संपादन केल्या असून, आता त्यांनी विन-विन एक्स्पर्ट नावाने स्वत:ची फायनांशियल कंपनी सुरू केली.

सरस्वती भुवन कॉलनी पूर्वमध्ये राजश्री राहतात. खूप शिकायचे ही जिद्द असल्याने मुलगी झाल्यावर एमकॉम केले नंतर एका खासगी आॅफिसात नोकरी पत्करली. अजून पुढे एलएलबी करण्याची इच्छा झाली तेव्हा सर्व व्याप सांभाळत तीन वर्षांत ती पदवीही संपादन केली मग जिल्हा न्यायालयासह उच्च न्यायालयात काही वर्षे प्रक्टिस केली.एवढे शिकूनही मनाला समाधान मिळेना म्हणून त्यांना सी.एस.करण्याचा ध्यास घेतला त्यासाठी वकिलीचे करिअर सोडून अचानक नवे करिअर करण्याचा धाडसी निर्णय घेतला.तोवर राजशी यांच्या मुलीचा विवाह होऊन त्याना जावई आला. मुलीच्या लग्नाच्या धावपळीतच कंपनी सक्रेटरी या अवघड करिअरची परीक्षा दिली अार्टीकलशिपही सुरू होती. काकू जिद्द सोडू नका तुम्ही नक्कीच सीएस व्हाल अशा त्याच्या सोबत सीएस करणाऱ्या तरुण मुलींचे त्यांना नेहमी प्रोत्साहन असायचे. चार वर्षांच्या अथक मेहनतीने राजश्री यांनी ऑगस्ट २०१६ मध्ये सीएस ही परीक्षा उत्तीर्ण केली अन् त्याच्या परिवाराला आनंद झाला नवरा नितीन पैठणकर,मुलगा , मुलगी, जावई या सर्वांनी त्याचे कौतुक केले.

मंगळसूत्र चोराला पकडून दिले...
राजशीयांच्या नावे आणखी एक विक्रम आहे. त्या शहरातल्या अशा पहिल्या महिला आहेत ज्यांनी पाठलाग करून मंगळसूत्र चोर पकडून दिले. १९९४ साली औरंगपुरा भागातून जाताना चाेरांनी त्यांचे मंगळसूत्र चोरून नेले. जिवाची भीती बाळगता त्यांनी मंघळसूत्र चोरांचा पाठलाग केला त्यांना पकडले त्या वेळी रस्त्यावरच्या लोकांनी मदत केली. त्या दोन्ही चोरांना सक्त मजुरीची शिक्षा झाली.
बातम्या आणखी आहेत...