आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्‍यमंत्री साहेब लक्ष द्या: महिला PSI ची दादागिरी, लोकांशी भांडली, वाॅचमनच्या पत्नीला धक्काबुक्की

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - इमारतीच्या प्रवेश मार्गावरच दुचाकी आडवी लावून पाणीपुरी खाण्यासाठी आलेल्या महिला पोलिस उपनिरीक्षिकेने सिडको कामगार चौकात तीन दिवसांपूर्वी दबंगगिरी केली. दुचाकी बाजूला घ्या असे कासलीवाल अपार्टमेंटच्या सुरक्षा रक्षकाने सांगताच त्या संतापल्या आणि तासभर अपार्टमेंटमधील रहिवाशांशी वाद घातला.
त्या एवढ्यावरच थांबता, त्यांनी मुकुंदवाडी पोलिसांच्या मदतीने रात्री ११ वाजता पुन्हा सुरक्षा रक्षकाच्या पत्नीला अटक करण्यासाठी घटनास्थळी जाऊन धिंगाणा घातला. त्यांच्या या गोंधळामुळे अपार्टमेंटमधील रहिवाशांनी संताप व्यक्त केला. हे प्रकरण पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडे पोहोचले. मात्र, त्यांनी कोणतीही ठोस कारवाई केली नाही. दरम्यान, काही कर्मचाऱ्यांच्या अशा वर्तनामुळे अख्खे पोलिस खाते बदनाम होत असून, लोक पोलिसांविरोधात का जात आहेत, याचेच हे एक ज्वलंत उदाहरण आहे.

या संदर्भात एका प्रत्यक्षदर्शींनी सांगितले, नेहा करेवाड या साध्या वेषात सोमवारी रात्री आठ वाजता कामगार चौकात तीन मैत्रिणींसोबत पाणीपुरी खाण्यासाठी आल्या होत्या. त्यांनी अपार्टमेंटच्या प्रवेशव्दारासमोरच दुचाकी उभी केली होती. दरम्यान अपार्टमेंटमधील एका व्यक्तिला कार बाहेर काढायची होती. सुरक्षारक्षकच या व्यक्तीची गाडी चालवतो. त्याने करेवाड यांना दुचाकी बाजूला घेण्यास सांगताच त्याला अरेरावी केली. दरम्यान चालकाची पत्नीने बाहेर आली आणि अरेरावी कशाला करता अशी विचारणा केली. सुरक्षा रक्षकाची पत्नी आई यांना करेवाड यांनी धक्काबुक्की करत त्यांना ढकलून दिले. यात सुरक्षा रक्षकाची पत्नी खाली कोसळली. मी पोलिस अधिकारी आहे, तुम्ही माझ्याशी वाद घालता का, असा दम दिला. रहिवाशांनी मध्यस्थी करत वाद मिटवला. परंतु रात्री ११ वाजता करेवाड एका प्रशिक्षणार्थी पीएसअाय महिला कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन घटनास्थळी अाल्या. काठी आपटत सुरक्षारक्षकाच्या पत्नीला बाहेर घराबाहेर बोलावले गाडीत बसवले.

काहींनी करेवाड यांना जवाब विचारताच त्यांनी तुम्ही मला मारहाण करता काय असा आरोप करत त्यांची शूटिंग केली. याच अपार्टमेंटमध्ये ग्रामीण पोलिस निरीक्षक अनिल वाघ राहतात, ते देखील मध्यस्थीसाठी आले. त्यांनी वाहतूक पोलिस निरीक्षक अविनाश अघाव यांना बोलावले. त्यानंतर प्रकरणावर पडदा पडला. करेवाड सुरक्षा रक्षकाच्या पत्नीने मुकुंदवाडी ठाण्यात परस्पर तक्रारी दिल्या.
कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलिसांवरहल्ले होता कामा नयेत, हीच ‘दिव्य मराठी’ची भूमिका आहे. मात्र, वैयक्तीक कारणांसाठी लोकांना त्रास देणाऱ्या काही कर्मचाऱ्यांमुळे पोलिसांविषयी जनक्षोभ उसळतो. ही बाब निदर्शनास आणून देण्यासाठीच हे वृत्त प्रसिद्ध करत आहोत.
पुढे वाचा...
> आयुक्तांना भेटणार
> अधिकाऱ्यांकडून चौकशी
> लाचेच्या जाळयात अडकल्या होत्या...
बातम्या आणखी आहेत...