आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - शहानूरमियां दर्गा भागातील झांबड कॉर्नरमधील महिलेने शनिवारी गळफास घेतला. सकाळी 11 च्या सुमारास हा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्या महिलेस तत्काळ घाटीत नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. अस्मिता राजू भालेराव (31) असे मृत महिलेचे नाव आहे. तिच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.

शनिवारी सकाळी राजू व अस्मिता दोघेच घरात होते. झोपण्यासाठी जाते, असे म्हणून अस्मिता खोलीत गेल्या आणि दरवाजा आतून बंद केला. त्यांना पंख्याला साडी अडकवून गळफास घेतला. अस्मिता यांची मुलगी शाळेतून घरी परतली आणि तिने अस्मिता ज्या खोलीत झोपल्या होत्या त्या खोलीचा दरवाजा ठोठावला. मात्र, आतून काहीही प्रतिसाद मिळत नसल्याने तिने वडिलास सांगितले. दरवाजा उघडत नसल्यामुळे राजूने तो तोडला असता अस्मिता यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ माणिक हॉस्पिटलमध्ये आणले. डॉक्टरांनी सल्ला दिल्यानंतर घाटीत हलवले. घाटीतील डॉक्टरांनी अस्मिता यांना मृत घोषित केले. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.