आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला हॉस्पिटलसाठी जागेची माहिती देऊनही प्रशासन ढिम्म

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - राज्य शासनाने शहरात महिला आणि मुलांसाठी दोनशे खाटांचे स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यासाठी निधी मंजूर केला आहे. मात्र, वर्षभरापासून महानगरपालिकेसह महसूल प्रशासनालाही जागा मिळत नसल्याचे समोर आले आहे. वर्षभरापूर्वी आमदार संजय शिरसाट यांनी जागा असल्याचे कळवले होते. त्यावर काहीच मार्ग निघाला नसल्याने पुन्हा गुरुवारी आमदारांनी गट नंबरसह जागा उपलब्ध असल्याचे पुरावे महसूल प्रशासनाला दिले असल्याचे समोर आले आहे.
शहरात सात एकर जागा उपलब्ध होत नसल्याने महानगरपालिकेने साताऱ्यात असलेल्या जागेची पाहणी केली. ही जागा महसूल प्रशासनानेच ताब्यात घेऊन मनपाला हस्तांतरित करण्याचा अहवाल दिला आहे. त्यावर अद्याप कोणतेच पाऊल उचलण्यात आलेले नाही. त्याचबरोबर आमदार शिरसाट यांनी वर्षभरापासून महसूल प्रशासनासह महानगरपालिकेला पत्र देऊन जागा मिळवून त्वरित कामाला प्रांरभ केल्यास नागरिकांना फायदा होणार असल्याच्या सूचना केल्या होत्या. त्यावरही प्रशासनाने कारवाई केलेली नाही. त्यामुळे शिरसाट यांनी पुन्हा गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन जागा उपलब्ध असल्याचे पुरावे म्हणून सातबारे दिले. गट नंबर ३०३ २८३ मध्ये शासनाची ८३ एकर जागा असून त्यापैकी एकर जागा रुग्णालयास घेता येऊ शकते, असेही निवेदनात म्हटले आहे. आता प्रशासनाकडून यावर काय कारवाई केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

^शहरात तातडीनेअनेक उपक्रमांसाठी जागा उपलब्ध करून दिल्या जातात. रुग्णालयासाठी मात्र जागा देण्यास विलंब केला जात आहे. प्रशासनाने राजकीय कामांपेक्षा सामाजिक कामाला प्राधान्य दिल्यास शहराचा विकास होईल. -आमदार संजय शिरसाट

^साताऱ्यात शासनाची जागा आहे. मात्र, प्रशासनाकडून ती घेण्यासाठी प्रयत्न केले जात नाहीत. शहरात स्मारक, स्मृतिवनाला जागा मिळते. मात्र रुग्णालयासाठी जागा घेण्यास प्रशासन का टाळाटाळ करते? -फिरोज पटेल, ग्रामस्थ, सातारा

सामाजिक कामाला प्राधान्य द्यावे
साताऱ्यात रुग्णालयाची आवश्यकता
शहरातमहानगरपालिकेचे ३३ दवाखाने असून मुख्य शासकीय वैद्यकीय रुग्णालयही (घाटी) शहरातच आहे. त्याचबरोबर शल्यचिकित्सा, डोळ्याची शस्त्रक्रिया करण्यासह कॅन्सर हॉस्पिटलदेखील शहरातच आहे. शिवाय चिकलठाणा परिसरातही सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल आहे. मात्र, नवीन शहरासह नव्याने मनपात समाविष्ट करण्यात आलेल्या सातारा, देवळाईत एकही मोठे शासकीय रुग्णालय नाही. साताऱ्यात सात एकर जागा उपलब्ध असल्याने तेथेच महिलांचे रुग्णालय होण्यासाठी आमदार शिरसाट यांनी पुढाकार घेतला आहे.
बातम्या आणखी आहेत...