आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिला मंगळसूत्र दिले, मला न्याय तर द्या..चंदा चौधरींची आर्तता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर - स्वच्छतागृहासाठी मंगळसूत्र विकणा-या महिलेला मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून तिचे मंगळसूत्र तर मिळाले; पण अशाच स्वच्छतागृहासाठी जिवावर बेतलेल्या महिलेला न्याय मिळेल का, असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे.

स्वच्छतागृह बांधण्याच्या कारणावरून वैजापूर तालुक्यातील बाजाठाण येथे ८ मे २०१४ रोजी ४५ वर्षीय अंगणवाडी सेविका चंदा चौधरी यांच्या अंगावर गावातील चौघांनी पेट्रोल टाकून जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. चंदा चौधरी यांनी आपल्या घराच्या आवारात स्वच्छतागृह बांधू नये, असे आरोपींचे म्हणणे होते. या प्रकरणी चौघांवर गुन्हेही दाखल झाले. त्याला सहा महिन्यांचा कालावधी उलटूनही पोलिसांनी आरोपींना अद्याप अटक केलेली नाही. याबाबत आपण पोलिस अधिका-यांकडे वारंवार विचारणा केली. मात्र, त्यांच्याकडून उडवाउडवीचे उत्तर दिले जाते.

काय आहे घटना
अंगणवाडी सेविका चंदा चौधरी यांनी आपल्या घराच्या पाठीमागील भागात नवीन शौचालयाचे काम सुरू केले होते. मात्र, त्यांच्या शेजारी राहणाऱे व्यापारी बाळू चोपडा, गणेश चोपडा, आनंद चोपडा, आशुतोष चोपडा यांनी त्या बांधकामास विरोध केला. सुरुवातीला चंदा चौधरी व चोपडा कुटुंबीयात यावरून शाब्दिक चकमक झाली; नंतर चौघांनी या महिलेच्या अंगावर थेट पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या महिलेने स्वत:ची सुटका करवून घेत थेट विरगाव पोलिस ठाणे गाठून झालेला प्रकार कथन केला. चौधरी यांच्या या तक्रारीवरून विरगाव पोलिसांनी ८ मे २०१४ रोजी कलम ३०७, ३२३, ५०४ ३४ अन्वये चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र, यापैकी काोणालाही अजून अटक केली नाही.

पुरावा उपलब्ध न झाल्याने अटक नाही
आपल्या गुन्ह्यातील आरोपींच्या अटकेबाबत चंदा चाैधरी यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत माहिती विचारली असता आरोपीविरुद्ध पुरावा उपलब्ध न झाल्याने त्यांना अटक केलेली नसल्याचा धक्कादायक खुलासा पोिलसांकडून करण्यात आला आहे. पुरावा उपलब्ध होताच आरोपींना अटक करण्याची तजवीज ठेवली असल्याचेही पोलिसांनी दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले आहे.

तपास अधिकारी बदला : फिर्यादी
विरगावचे सहायक पोलिस निरीक्षक बी. एन.रयतुवार हे गुन्ह्याचा तपास योग्य रीतीने करीत नसल्याने त्यांच्याकडून हा तपास दुस-या अन्य अधिका-याकडे वर्ग करावा, अशी मागणी चंदा चौधरी यांनी केली आहे.

पुढील स्लाइडमध्ये, सरकारचा विरोधास