आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पती, मुलाला जेवू घातले अन् रेल्वेसमोर उडी घेऊन संपवले जिवन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- सोमवारी दुपारी एकच्या सुमारास पती कामावरून घरी आल्यानंतर पतीला आणि मुलाला जेवायला वाढले. त्यानंतर बाहेर जाऊन येते असे सांगून ती घराबाहेर पडली. त्यानंतर अवघ्या तासाभरात तिने रेल्वेसमोर जीव दिल्याची बातमी आली आणि कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली. 

वर्षा नानू अंभुरे (३२, रा. बनेवाडी) असे तिचे नाव आहे. तिला ११, वर्षांची दोन मुले आहेत. ती गेल्या दोन वर्षांपासून गेवराई येथील इलेक्ट्रिक कंपनीत काम करत होती. तिचा पती शालेय मुलांसाठी रिक्षा चालवतो. 

फोटो व्हायरल झाल्याने
घटनास्थळी असलेल्या काही तरुणांनी घटनेनंतर तिचे मोबाइलमध्ये फोटो काढले. ते व्हायरल झाल्यावर तिची ओळख पटली. बनेवाडीतील नागरिकांनी छावणी पोलिसांना माहिती दिली. तिने आत्महत्या का केली, याचे कारण रात्री उशिरापर्यंत स्पष्ट झाले नव्हते. छावणी पोलिस ठाण्याचे मुख्य हवालदार लकडे तपास करत आहेत. 
बातम्या आणखी आहेत...