आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबादेत स्वाइन फ्लू संशयित महिलेचा मृत्यू; घाटीत दोन रुग्ण दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- स्वाइन फ्लूच्या संशयित महिला रुग्णाचा घाटीमध्ये मंगळवारी (27 ऑगस्ट) पहाटे साडेतीन वाजता मृत्यू झाला. करंजगाव (ता. कन्नड) येथील आशा अण्णा अडुळे (25) या महिलेला अत्यवस्थ अवस्थेत सोमवारी रात्री साडेदहा वाजता दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना महिलेचा मृत्यू झाला. या महिलेचा सॅम्पल घेण्यात आला आहे. तसेच सध्या स्वाइन फ्लू वॉर्डात दोन संशयित रुग्ण दाखल आहेत. यामध्ये नारेगाव येथील 18 वर्षांच्या युवतीचा, तर पडेगाव येथील 40 वर्षांच्या पुरुषाचा समावेश आहे. पडेगावच्या रुग्णाचा खासगी प्रयोगशाळेत स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह अहवाल आला आहे. तिघांचे सॅम्पल पुण्याच्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलाजी’ला पाठवण्यात येणार आहेत, अशी माहिती निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. युसुफ मणियार यांनी दिली.