आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेत प्रसूती, क्रॉसिंगसाठी न थांबता; अजंता एक्स्प्रेस धावली ‘वन रन’!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लासूर स्टेशन- दिवाळीतील धनत्रयोदशीच्या मुहूर्तावरच ‘धन की पेटी’ म्हणजे बालिकेचा जन्म झाला, तोही आठवणीत राहावा असाच. लासूर स्थानकात येताच मनमाड-सिकंदराबाद अजंता एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या गर्भवतीला प्रसूतीकळा सुरू झाल्या.

पती, नातलग सोबत होतेच. प्रसंग ओळखून रेल्वे प्रशासनानेही नंदीग्राम एक्स्प्रेसची क्राॅसिंग गाडी कुठेही न थांबवता “वन रन’ थेट औरंगाबादला आणली. १०८ अॅम्ब्युलन्स मागवून आई व नवजात बालिकेला घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले. दोघी मायलेकी सुखरूप आहेत. रेल्वे प्रवासी सेनेने आतापर्यंत सात गर्भवती महिला प्रवाशांना मदत केली आहे.
रेल्वेत वैद्यकीय मदतीसाठी संपर्क क्रमांक : ९६७३००८६२१

माणुकसीचे दर्शन रेल्वेच्या अधिकाऱ्यांचे प्रसंगावधान
पूर्णेला जाणारे कुटुंब मनमाडहून निघाले. करंजगाव ते लासूरदरम्यान गर्भवतीला प्रसूतिकळा सुरू झाल्या. पती, नातलग सोबत होते. रेल्वे सेनेचे मनोजकुमार यांना ही बाब कळली. स्टेशन मास्टर संजय बरनवाल यांना त्यांनी विनंती केली. वरिष्ठांच्या परवानगीने गाडी विनाथांबा धाडली.

पुढील स्लाइडवर वाचा...
> माणुकसीचे दर्शन रेल्वेच्या अधिकाऱ्यांचे प्रसंगावधान
> पुरुष उतरले तृतीयपंथीयांनी केली अशीही मदत
> दहा वेळा फोन करूनही १०८चा नो रिस्पाॅन्स
बातम्या आणखी आहेत...