आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Women Empowerment On Agenda, MIM Women Cadidates Clared Stand

अजेंड्यावर महिला सक्षमीकरण, एमआयएमच्या उच्चशिक्षित महिला उमेदवारांनी जाहीर केली भूमिका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - विधानसभा निवडणुकीत जोरदार मुसंडी मारणाऱ्या एमआयएमकडे मनपा निवडणुकीत सर्वांचेच लक्ष लागले आहे. कालच पक्षातील उमेदवारांची यादी जाहीर झाली. त्यातील महिला उमेदवारांनी चांगलीच मोर्चेबांधणी केली आहे. महिला सक्षमीकरण आणि मूलभूत गरजांच्या मुद्द्यांवर मतदात्यांना आवाहन करण्याचा विचार त्यांनी व्यक्त केला.
महानगरपालिका निवडणुकीत ५० टक्के महिला उमेदवार राहणार आहेत. मुस्लिम महिलांनी सक्रीय राजकारणात येण्यासाठी हे उत्तम व्यासपीठ आहे. जाहीर झालेल्या यादीमध्ये उच्चशिक्षित मुस्लिम महिला उमेदवार असल्याने सहाजिकच सर्वांच्या आशा उंचावल्या आहेत. या उमेदवारांशी दिव्य मराठीने संवाद साधला असता, सर्वांनी एकमुखाने महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, सुरक्षा आणि स्वच्छता गृहांचा मुद्दा आर्वजून नमुद केला. पाणी,रस्ते, ड्रेनेज व्यवस्था तसेच कचरा व्यवस्थापनासारख्या मुलभूत प्रश्नाकडेही त्यांनी लक्ष वेधले.

समस्या सोडवणार
मी गेल्या १५ ते २० वर्षांपासून या वॉर्डात राहते. रस्ते, पाणी, ड्रेनेजलाईन सारख्या मुलभूत सुविधा आमच्याकडे नाहीत. या मुलभूत प्रश्नांची सोडवणुक माझ्यासाठी महत्त्वाची आहे. याशिवाय वॉर्डातील सर्वांशी संवाद साधत समस्या सोडवण्यावर भर राहिल. महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यावर माझे लक्ष राहिल. त्यासाठी लागणारी प्रत्येक मदत मी करणार आहे.
सविता वाघोले, शताब्दीनगर वॉर्ड क्र. २७

शिक्षण, सुविधा देणार
महिलांचा विकास हा त्यांना शिक्षण नसल्याने होत नाही. त्यामुळे वॉर्डातील प्रत्येक मुलगी शिक्षण घेईल असा माझा प्रयत्न आहे. यािशवाय पथदिवे, पाणी, रस्ते, ड्रेनेज व्यवस्था अशा आमच्या परिसरातील मुलभूत सुविधांचे माझ्यापूढे आव्हान आहे. माझे शिक्षण बीएएललबी झाले आहे. माझ्याप्रमाणेच इतरही उच्चशिक्षित महिला सभागृहात आल्यास मोठा फायदा होईल.
शबनम खान, हमालवाडा वाॅर्ड क्र. १०८

खऱ्या लाभार्थींपर्यंत पोहोचणे
मनपाच्या अनेक उत्तम योजना आहेत. खऱ्या लाभार्थींपर्यंत योजना न पाेहचल्याने विकासाचा वेग मंदावतो. उपलब्ध साधन सामग्रीचा योग्य वापर आणि नियोजन केल्यास अनेक कामे चुटकीसरशी करता येतील. हेच मी करणार आहे. मुलभूत प्रश्नंासह याकडे माझे लक्ष आहे. मी पहिल्यांदाच सभागृहात जाणार आहे, मात्र माझे पती आधी नगरसेवक असल्याने मला अनेक योजनांच्या अंमलबजावणीत अडचणी मािहती आहेत, त्या सोडवण्याचे काैशल्य मी पणाला लावणार आहे.
तहेसिन बेगम, लोटा कारंजा, वॉर्ड न. २२

महिलांसाठी सुरक्षा
आपल्या समाजव्यवस्थेत महिला सुरक्षित नाहीत, हे वारंवार दिसून आले आहे. त्यांना कुटूंब आणि सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित वातावरण मिळावे याकडे माझे लक्ष राहिल. त्यासाठी काही नवी पाऊले उचलता येतील का, याबाबत मी विचार करत आहे.
सुलताना बेगम, नारेगाव, वॉर्ड क्र. ३६