आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'मला एक चान्स दे’ म्हणत पोलिस कर्मचाऱ्यानेच केला महिलेचा विनयभंग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- वडोदबाजार पोलिस ठाण्यात जमादार म्हणून कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याच्या विरोधात सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेश बबनराव सनवे असे त्याचे नाव आहे. मे रोजी दिल्ली गेट परिसरात ४५ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. 

वडोद बाजारात महिलेची वडिलोपार्जित मालमत्ता आहे. या मालमत्तेचा वाद सुरू असून या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा तपास सनवे याच्याकडे होता. तपासासाठी काही कागदपत्रे हवी आहेत असे म्हणून त्याने पीडितेला घाटीत बोलावले. त्या ठिकाणी फिर्यादी महिला पोहोचल्यानंतर पुन्हा विभागीय आयुक्त कार्यालयाजवळ बोलावले. रिक्षातून उतरल्यानंतर “मी तुझा नवरा आणि मुलाच्या विरोधात असलेल्या केसचा फैसला लावून टाकतो, मला एक चान्स दे’ असे म्हणत त्याने तिचा हात पकडला. “सनवे हा गेल्या अनेक दिवसांपासून मला त्रास देतो. रात्री-बेरात्री फोन करतो,’ अशी तक्रार या महिलेने केली आहे. 

तक्रार अर्ज दिल्यानंतर पाच दिवसांनी सिटी चौक पोलिस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, या पोलिस कर्मचाऱ्यानेही महिलेच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणला म्हणून सिटी चौक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 
बातम्या आणखी आहेत...