आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला उद्योजकांची शहरात संघटना, अमृता फडणवीसांच्या हस्ते उद्या उद्घाटन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजची (सीआयआय) महिला शाखा इंडियन वुमेन नेटवर्कचे (आयडब्ल्यूएन) उद्घाटन १६ सप्टेंबर रोजी शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.
‘सीआयआय’ ही देशातील सर्वात मोठी उद्योजकांची संघटना असून हजारांपेक्षा जास्त सभासद आहेत. यात महिला उद्योजकांचा सहभाग वाढावा यासाठी चार वर्षांपूर्वी सीआयआयने महिलांसाठी आयडल्ब्यू एन म्हणजे इंडियन वुमेन नेटवर्क ही संघटना निर्माण केली. देशातील बारा मोठ्या शहरांत या शाखांना सुरुवात झाली असून मुंबई, दिल्ली, हैदराबादसारख्या मोठ्या शहरांतील महिला उद्योजक यात सहभागी होत आहेत. औरंगाबाद शहरातील उद्योजिका निरुपमा बाफना या औरंगाबाद चॅप्टरच्या पहिल्या अध्यक्षा राहतील.
कायआहे संघटनेचे काम? : हीसंस्था महिलांसाठी पूर्णवेळ काम करते. यात उद्योजक महिलांचा सहभाग तर राहीलच शिवाय गृहिणी, विद्यार्थिनींनाही सभासद होता येणार आहे. अट एकच, काही तरी उद्योग करण्याची इच्छा किंवा ऊर्मी हवी.
उद्योजक करणार
आमच्या संघटनेत उद्योजिका, तर सामान्य गृहिणीही सहभागी होऊ शकतात. मात्र, त्यांना उद्योग करण्याची इच्छा हवी. निरुपमाबाफना, अध्यक्ष, आयडल्ब्यूएन
सर्वात मोठी संघटना
राज्यात यासंघटनेचे ९० सभासद आहेत. आपण पहिल्याच दिवशी शंभर सभासदांसह ही संघटना सुरू करत आहोत. त्यामुळे आपल्या शहरातील महिलांना उद्योजक होण्याची मोठी संधी आहे. संदीप नागोरी, अध्यक्ष, सीआयआय
बातम्या आणखी आहेत...