आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हुंडा घेणाऱ्यांच्या विवाहाला जाणार नाही, समाज सुधारण्यासाठी आपल्यापासून सुरुवात व्हायला हवी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - आरक्षण आणि अॅट्रॉसिटी कायद्यातील दुरुस्तीसोबत मराठा मुक्ती मोर्चा यापुढे हुंडामुक्तीच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करणार आहे. यासंदर्भात ‘दिव्य मराठी’ने वृत्त प्रसिद्ध केले. त्याचे या तरुणींनी उत्स्फूर्त स्वागत केले. हुंडा घेऊन होणाऱ्या विवाह सोहळ्यात सहभागी होणार नाही, असे त्यांनी सांिगतले. प्रत्येक सामाजिक बदलाला वेळ लागतोच, असे नाही. समाजाच्या व्यापक हिताचे बदल गतीने होऊ शकतात, असेही त्यांचे म्हणणे आहे.
मराठा समाजाच्या मूकमोर्चात यापुढे या समाजाने हुंडा देऊ नये अन् घेऊ नये, अशी शपथ घेतली जाईल, असे संयोजकांनी जाहीर केले. खरेच असे झाले तर अनेकांचे प्राण वाचतील. कारण मुलीच्या लग्नासाठी पैसे नाहीत म्हणून वधूपित्याने आत्महत्या केल्याच्या घटनाही पुढे आल्या आहेत. बापाकडे पैसे नाहीत म्हणून मुलीने आत्महत्या केल्याचे प्रकार घडलेले आहेत. परंतु हुंडाच बंद झाला तर आत्महत्याही थांबतील आणि मुलींच्या लग्नासाठी स्वत:ची जमीनही विकण्याची वेळ येणार नाही, असे संयोजकांचे म्हणणे आहे.

कीड नष्ट करणार
^समाजाला परंपरेने लागलेली कीड नष्ट करण्यासाठी हुंडा देणार नाही, घेणार नाही, अशी शपथ दिली जाणार आहे. आम्ही तरुणाई सहभागी होणार आहे. निकितापाटील, विद्यार्थिनी
^वधू-वरसूचककेंद्रात आम्ही दोन्हीही बाजूंच्या नातेवाइकांची भेट घालून देतो. त्यांनी हुंडा घ्यावा किंवा नाही, हा त्यांचा विषय. परंतु यापुढे आम्ही हुंडा घेऊ, देऊ नका अशी विनंती नक्की करू. हा सामाजिक विषय आहे. मराठाच नव्हे, अन्य समाजाला लागलेली कीड आहे. ती दूर झालीच पाहिजे. पंजाबराववडजे, संचालक, मराठा समाज वधू-वर सूचक केंद्र.

^हुंड्याची पद्धतसमूळ नष्ट करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. मुलगा जास्त शिकला म्हणून मुलींच्या आई- वडिलांनी हुंडा देणे चुकीचे आहे. जयश्रीपाटील, विद्यार्थिनी
^चांगला शिकला-सवरलेलामुलगा मिळवण्यासाठी जास्त हुंडा द्यावा लागतो, तरच मुलीचे लग्न चांगल्या घरात होते. ही संकल्पना आता बदलली पाहिजे. -प्रा.ए. व्ही. पालकर

^ खरेतर हुंडाबंदीचा कायदा १९६१ मध्ये झाला, परंतु त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे या सामाजिक बदलाची सुरुवात मी स्वत:पासून करणार आहे. -प्रणिता रेंढे, विद्यार्थिनी
^समाज सुधारण्यासाठीमी स्वत:पासून सुरूवात करण्याचा निर्धार केला आहे. हुंडा घेणाऱ्यांच्या विवाह सोह‌ळ्याला आपण यापुढे जाणार नाही, असा निर्णय घेतला आहे. -अॅड. स्वाती नखाते, औरंगाबाद.
बातम्या आणखी आहेत...