आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओली नव्हे, कांदेपोहे पार्टी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एरवी पुरुषांमध्ये ओली पार्टी हमखास रंगत असली तरी निवडणुकीच्या काळात त्यात जास्तच भर पडते. कार्यकर्त्यांना आणि मतदात्यांना खुश करण्यासाठी विविध प्रकारच्या पार्ट्या रंगत असतात. आता मात्र महिलांमध्येदेखील अशा पार्ट्यांचे प्रमाण वाढले आहे. या पार्टीला फक्त कांदापोह्याचे स्वरूप आल्याचे चित्र दिसून येत आहे.

महानगरपालिकेच्या निवडणुकीत ११३ पैकी ५७ वॉर्डांत महिला आरक्षण असल्याने इच्छुक महिलांच्या प्रचारासाठी कोणतीच कसर कमी पडू नये याची काळजी घेतली जात आहे. यात महिलांमध्ये पोहे पार्टी जोरात सुरू झाली आहे. यासाठी इच्छुकांच्या मैत्रिणी, शेजारणी मदत करत आहेत. या पोहे पार्टीच्या निमित्ताने मत मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळेच महिलांनी किटी पार्टीप्रमाणे मराठमोळी कांदेपोहे पार्टी आयोजित करण्यास सुरुवात केली आहे. मिळून साऱ्या जणी मनपा निवडणूक लढू आणि जिंकूसुद्धा, असे म्हणत आपले सर्व प्रश्न सोडवू, अशी आश्वासनेदेखील या कांदेपोहे पार्टीनिमित्त दिली जात असल्याचे चित्र दिसून आले.
पुढे वाचा..