आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड: परिस्थितीला ‘चितपट’ करणाऱ्या पाच बहाद्दर लेकींची ‘दंगल’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- कुस्ती...मर्दांचाखेळ! खुराक, व्यायाम, आणि लाल मातीच्या आखाड्यात सराव...पण ‘दंगल’ चित्रपटाने कुस्तीत राष्ट्रकुल स्पर्धेसह अनेक सुवर्णपदक विजेत्या गिता फोगटचा संघर्षमय प्रवास उलगडला. लेकींना आखाड्यात उतरवून समाजव्यवस्था मल्लांना आसमान दाखवणारा महावीरसिंग फोगट सारखा बापही दाखवला... बीडच्या मातीतही अशाच अनेक गिता आणि महावीरसिंग मागील अनेक वर्षांपासून काम करत असुन हे महिलांसाठी प्रेरणादायी आहे. 

यांनीही गाजवला कुस्त्यांचा फड 
या मुलींबरोबरच प्रतिभा सांगळे, सारिका काळे, कल्पना बांगर, दीपाली तोडकर यांनीही राष्ट्रीय आंतर विद्यापीठ स्पर्धा, वरिष्ठ राज्य कुस्ती स्पर्धेत सहभाग नोंदवत पदके मिळवली अाहेत. प्रतिभा सांगळे कुस्तीच्या सरावामुळेच पोलिस दलात भरती झाली अाहे. एकेकाळी स्त्री जन्माच्या बाबतीत देशात ‘रेड झोन’ मध्ये गेलेल्या बीडमध्ये या मर्दानींनी साऱ्या देशाचे लक्ष वेधून घेत कुस्तीसाख्या पुरुषी खेळातही वर्चस्व निर्माण केले आहे.

असुविधा झेलत श्यामल मेंडकेने मिळवले यश... 
श्यामल भागवत मेंडके (रा. नाकलगाव ता. माजलगाव ) येथील असून सुविधांचा अभाव असताना शालेय कुस्ती बरोबरच राष्ट्रीय स्तरावर चार वेळा सहभाग नोंदवणाला आहे. २०१० मध्ये औरंगाबादेत झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेेत ४६ किलो वजन गटात सिलव्हर मेडल त्यानंतर पंजाबमधील स्पर्धेत ब्राँझ मेडल तिने पटकावले आहे. राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धांत विविध वजनी गटात दहापेक्षा अधिक पदकांची शिदाेरी तिच्याबरेबर अाहे. 
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...