आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला पोलिस ठाण्याच्या केवळ गप्पाच; महाराष्ट्रात एकही नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- २०१२च्या दिल्लीतील निर्भया बलात्कार हत्याकांडाच्या घटनेनंतर तत्कालीन गृहमंत्र्यांनी देशभरात महिलांसाठी महिलांनी चालवलेली पोलिस ठाणी सुरू करण्याची घोषणा केली होती. मात्र, याची अंमलबजावणी करण्यात पुरोगामी महाराष्ट्र अपयशी ठरले आहे. देशभरात एकूण ५३५ महिलांसाठीची पोलिस ठाणी असताना महाराष्ट्रात असे एकही ठाणे सुरू झाले नाही. स्वतंत्र महिला पोलिस ठाणे नसलेल्या २९ पैकी छोट्या राज्यांत मोठ्या महाराष्ट्राचा समावेश आहे.

दिल्लीतील २०१२ मधील निर्भया घटनेनंतरच खास महिलांची पाेलिस ठाणी सुरू करण्याच्या हालचालींना सुरुवात झाली. तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सर्व राज्यांना अॅडव्हायझरी जारी करून एका जिल्ह्यात किमान एक स्वतंत्र महिला पोलिस ठाणे सुरू करण्याची सूचना केली होती. तसेच प्रत्येक पोलिस ठाण्यात महिला आणि बालकांसाठी खास डेस्क सुरू करण्याची सूचना करण्यात आली होती. सध्या २९ पैकी २५ राज्यांत ५३५ स्वतंत्र महिलांची पाेलिस ठाणी सुरू आहेत. यापैकी देशात सर्वाधिक १९९ म्हणजेच ३८.२ टक्के तामिळनाडूत आहेत. उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, झारखंड, पश्चिम बंगाल आदी राज्यांचा क्रमांक आहे. मध्य प्रदेश, मणिपूर (९), पंजाब (७), ओडिशा (६), केरळ (५), त्रिपूरा, छत्तीसगड (४), हिमाचल प्रदेश (३), उत्तराखंड, हरियाणा, जम्मू काश्मीर (२) तर अरुणाचल प्रदेश, आसाम गोव्यात प्रत्येकी एक महिला पोलिस ठाणे आहे.

केंद्राच्या सूचनेकडे दुर्लक्ष करणाऱ्या राज्यात मिझोरम, नागालैंड, सिक्कीम महाराष्ट्राचा समावेश आहे. केंद्रशासित सात पैकी दादर आणि नगरहवेली वगळता अन्य राज्यांनी असे पोलिस ठाणे सुरू केलेले नाही. केंद्रिय गृहखात्याच्या ब्युरो ऑफ पोलिस रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंटच्या वार्षिक अहवालात ही बाब स्पष्ट झाली.

एकीकडे एकही महिला पोलिस ठाणे नसताना महाराष्ट्रातील महिला पोलिसांची संख्या देशातील इतर राज्यांपेक्षा अधिक आहे.

पोलिसांत संख्या लक्षणीय
कॉन्स्टेबल,पीएसआय उपअधीक्षक पदांवर आरक्षण मिळाल्यानेे ठाण्यांत महिलांची संख्या वाढली. स्वतंत्र महिला पोलिस ठाण्याचा निर्णय वरिष्ठ स्तराची बाब आहे. महिलांप्रति संवदेनशील होण्याची गरज अाहे. तरच अत्याचार कमी होतील.
-विश्वास नांगरे पाटील, विशेष पोलिस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र

स्वतंत्र ठाणे हवेच
महिलांसाठी स्वतंत्रठाणे हवेच. पण तसे झाल्यानेे महिलांवरील अत्याचार थांबतील असे म्हणणे चुकीचे. महिलांवर अत्याचार हे मानसिक आजारांचे प्रतीक आहे. असे अत्याचार टाळण्यासाठी पुरुषांनी संवेदनशील होणे गरजेचे आहे.
-सुधाकर सुरडकर, माजी पोलिस महानिरीक्षक, मुंबई
बातम्या आणखी आहेत...