आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेदभाव न पाळता प्रशिक्षण घेऊन होताहेत स्वावलंबी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- होतकरू व गरजू महिलांना स्वत:च्या पायावर उभे करण्याबरोबरच सामाजिक ऐक्यासाठी हारुण मुकाती इस्लामिक सेंटरने खारीचा वाटा उचलला आहे. कोणताही भेदभाव न करता या सेंटरच्या वतीने मुली आणि महिलांना कॉम्प्युटर, टायपिंग क्लास, शिलाई, फॅशन डिझायनिंग, मेंदी क्लास, अरबी-इस्लामिक क्लासद्वारे मॅरेज ब्युरोचे मोफत प्रशिक्षण दिले जात आहे. याशिवाय दर शुक्रवारी सर्वांसाठी अन्नदान, मोफत पाणीवाटप, कुणाच्या घरात िनधन झाले असेल तर मृतदेह ठेवण्यासाठी फ्रीझर बॉक्सची व्यवस्था, २४ तास अॅम्ब्युलन्स सेवा आदी विविध उपक्रम राबवले जात आहेत. बायजीपुरा येथील हारुण मुकाती इस्लामिक सेंटरमध्ये २ हजार ७५ महिला, तरुणी विविध प्रशिक्षण घेत आहेत. कॉम्प्युटर अँड टायपिंगमध्ये ५००, शिवणकाम ३००, कुकिंग २७५, अरबी इस्लामिक क्लासेस ७०० आणि मेंदीचे ३०० विद्यार्थिनी प्रशिक्षण घेत आहेत.
सेवेतून पुण्याई मिळते...
गरजूंसाठी खर्च केल्यास पुण्याई मिळते. आपल्यासाठी जगण्यापेक्षा इतरांसाठी जगणे यातच खरा आनंद आहे. अनेकांकडे पैसा आहे, त्यांनीदेखील इतरांसाठी खर्च करावा.
युसूफ मुकाती, अध्यक्ष, हारुण मुकाती इस्लामिक सेंटर

वयाची अट नाही : या प्रशिक्षणासाठी वयाची अट नाही. वधू-वर सूचक केंद्रामार्फत पालकांना नि:शुल्क नोंदणीची व्यवस्था करण्यात आली आहे. केंद्रामध्ये युसूफ मुकाती, मशीला नेवीवाल, मुमताज मेमन, सीमा शालिमार यांच्यासह इतर कर्मचारी प्रशिक्षण देत आहेत.