आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदानाअाधीच शिऊरच्या शेकडो महिलांनी फोडले देशी दारूच दुकान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिऊर- अनेकांचे संसार देशोधडीला लावणाऱ्या देशी दारूच्या दुकानाविरोधात एल्गार पुकारणाऱ्या शिऊर गावात तीन वर्षांपूर्वी ग्रामसभेत ठराव घेतला होता. मात्र, या सभेची व्हिडिओ शुटिंग आणि महिला मतदारांच्या नोंदीचे नियोजन ग्रामपंचायतकडून झाल्याने उत्पादन शुल्क विभागाने देशी दारूचे दुकान हटवण्याचा प्रस्ताव फेटाळून लावला होता. दरम्यान, मे २०१७ च्या ग्रामसभेत पुन्हा दारूबंदीचा ठराव घेण्यात आला. मात्र, तीन वर्षांपूर्वीचीच पुनरावृत्ती होऊ नये म्हणून संतप्त ७० ते ८० महिलांनी या दुकानावर हल्ला चढवला. 

महामार्गालगतचे बिअर बार बंद झाले असले तरी गावाशेजारील देशी दारूचे दुकान अजूनही सुरू असल्याने विदेशी पिणारे मद्यपी नाइलाजास्तव आता देशीकडे वळले आहेत. अगदी सहज मिळणाऱ्या देशीमुळे घराघरात महिलांना वादविवादाला सामोरे जावे लागत असल्याने त्रस्त झालेल्या महिलांनी एल्गार पुकारत थेट शासनमान्य देशी दारू दुकानावरच दुपारी १२ वाजता हल्ला चढवत दुकानात तोडफोड करून टाळे ठोकले. तसेच दुकानातील बाटल्यांचे बॉक्स बाहेर काढत फोडले. आंदोलनानंतर महिलांनी थेट पोलिस ठाणे गाठून दुकान कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी केली. दरम्यान, तेथे असलेल्या मद्यपींना पिटाळून लावत दुकानावर ताबा मिळवत तोडफोड केली. दुपारी चार वाजेनंतर मालकाने पुन्हा दुकान सुरू केले होते. सपोनि धनंजय फराटे यांच्या पथकाने सायंकाळी आठ वाजता पंचनामा करत दुकान बंद करण्याची वेळ झाल्याचे सूचित करून दुकान बंद करण्यास सांगितले. 

दारू दुकान बंद करण्यासाठी घोषणाबाजी 
संतप्त झालेल्या महिलांनी स्वयंप्रेरणेतून दि रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास दारूविक्री करणाऱ्या दुकानावर मोर्चा काढून दुकानाची तोडफोड करून दुकानाला टाळे ठोकले, तर दारू दुकान परिसरात जाळपोळ करून दुकान पेटवण्याचादेखील प्रयत्न महिलांनी केला. यावेळी महिलांनी दारू दुकान बंद करा अशा जोरदार घोषणा देत दुकानावर हल्लाबोल केला. मुख्य बाजारपेठ असलेल्या शिऊरमध्ये देशी दारू परवानाधारकासह अवैद्य दारू सर्रासपणे विक्री केली जात असल्याने गावातील संतप्त झालेल्या ७० ते ८० महिलांनी दारूविक्रीविरोधात एल्गार पुकारत दुपारी बारा वाजेच्या सुमारास परवानाधारक दारूविक्री केंद्रावर हल्लाबोल केला. 

महिलांचा एल्गार 
गावातील संतप्त झालेल्या ७० ते ८० महिलांनी दारूविक्री-विरोधात एल्गार पुकारत दुपारी बारा वाजेच्या सुमारास परवानाधारक दारूविक्री केंद्रावर हल्लाबोल केला.

सायंकाळी पंचनामा 
महिलांनी दुकानाला टाळे ठोकल्यावर चार वाजता दुकान उघडले होते. सायंकाळी पोलिसांनी पंचनामा करत दुकान बंद होण्याच्या वेळेची सुचना दिली. 

झिंगाटवीरांना पिटाळले 
महिलांनी रौद्ररूप धारण करून या दुकानाची तोडफोड केली, त्याच वेळी दारू सेवन करत असलेल्या झिंगाटवीरांना महिलांनी पिटाळून लावले. 

निवेदन ठराव देणार : सरपंच 
ग्रामसभेत शिऊर येथील परवानाधारक दारू दुकान बंद करण्यात यावे यासाठी ठराव घेण्यात आला असून पोलिस अधीक्षक आरती सिंह यांना निवेदन देण्यात येऊन दारू दुकान कायमस्वरूपी बंद करण्यासाठी त्वरित कार्यवाही करणार असल्याचे सरपंच नितीन चुडीवाल यांनी सांगितले. ज्या महिला स्वतःहून पुढे आल्या त्यांचा सत्कार करणार असल्याचे मा. सदस्य पैठणपगारे यांनी सांगितले. 

...तरच होते दारूचे दुकान बंद 
दारूचे दुकान बंद करावयाचे असेल तर प्रथम ग्रामसभेत तसा ठराव घ्यावा लागतो. त्या ठरावाच्या प्रती वरिष्ठ कार्यालयाला देऊन गावातील महिलांचे मतदान घेण्यात येते. या मतदानाच्या आकडेवारीवरून दारूचे दुकान हद्दपार होते. यात कोरम पूर्ण नसेल तर ठराव बारगळतो. दुकान सुरूच राहते. यापूर्वीच शिऊरला असा प्रकार घडला होता. त्यामुळे ठराव होऊनही महिला आक्रमक झाल्या. 
बातम्या आणखी आहेत...