आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला मंडळ औरंगाबादतर्फे शारदोत्सव उत्साहात साजरा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- महिला मंडळ औरंगाबादतर्फे औरंगपुरा येथील शिशुविहार शाळेत नुकताच शारदोत्सव साजरा करण्यात आला. या उत्सवातील पहिले गुंफले पुष्प आरती भिडे व जयश्री बुदगे यांच्या सुश्राव्य गायनाने. दुसरे पुष्प वैशाली देव यांच्या संत मीराबाईच्या जीवनावरील कीर्तनाने अत्यंत मधुर अशा आवाजात मीरा यांचे चरित्र सादर करण्यात आले.
प्रा. पंकजा वाघमारे यांनी प्रेरणादायी आदिशक्ती या विषयावर गुंफताना वेदकाळापासून मनुस्मृती,कौटिल्याचे अर्थशास्त्र,ज्ञानेश्वरीपासून आजच्या काळापर्यंत आढावा घेतला. ओघवत्या भाषेत आपल्यातील आदिशक्तीला जागवण्याचे आवाहन त्यांनी केले. चौथ्या पुष्प जागर ग्रुपच्या पद्मजा कुलकर्णी यांनी मंडळाच्या सदस्यांनी जागर, जोगवा, भारूड, दीपनृत्य देवीची विविध पदे,मल्हारीमार्तंडाची गीते सादर करून रसिकांची मने जिंकली. पाचव्या पुष्पात वृषाली श्रीकांत यांनी आजची स्त्री सुरक्षित आहे? या विषयावर विवेचन केले. शारदेची सजावट ठाकूर यांनी केली. या शारदोत्सवात संस्थेच्या अध्यक्षा शालिनी आणि सुशीला नाईक आशा देशपांडे, मंगला वैष्णव, संगीता देशमुख, करुणा वैद्य, मंदा कुलकर्णी,शालिनी बीडकर, सुलोचना नाईक, कमळताई संकलेच्या, सरिता देशमुख यांची उपस्थिती होती.