आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात आज महिलांचा जागर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- जागतिक महिला दिन आणि सावित्रीबाई फुले स्मृतिदिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महात्मा फुले सामाजिक समता प्रतिष्ठान आणि जनता सामाजिक संस्थेतर्फे एन-2 प्रबोधनकार ठाकरेनगरातील बीएम सेक्टरच्या उद्यानात शनिवारी दुपारी चार वाजता कार्यक्रम होईल.
विद्यापीठातील विद्यार्थी कल्याण विभागाच्या संचालक प्रा. डॉ. चेतना सोनकांबळे या उद्घाटन करतील.‘भारतातील स्त्रियांच्या विकासात सावित्रीबाई फुले यांचे योगदान’ या विषयावर ज्येष्ठ कवयित्रीडॉ. प्रतिभा अहिरे यांचे व्याख्यान होईल.अध्यक्षस्थानी नगरसेविका सत्यभामा शिंदे राहतील. शाहीर वसुधा कल्याणकर यांचा पोवाडाही सादर करण्यात येईल. उपस्थित राहण्याचे आवाहन दामूअण्णा शिंदे, संयोजिका प्रा. मंजूषा लांडगे, अनिता देवळे, प्रा. अश्विनी मोरे, प्रजाला मगर, कल्पना गोर्डे, ज्योती भिवसने यांनी केले आहे.
महिला मंडळातर्फे ऋचा दाशरथी व मैथली भोकरे यांच्या भरतनाट्यम नृत्याविष्काराचे आयोजन र्शेयनगरातील शिशुविकास मंदिरात करण्यात आले आहे. अध्यक्षस्थानी शलिनीताई देशपांडे राहतील. उपस्थित राहण्याचे आवाहन सुशीला नाईक, सिंधुताई भालेराव, आशा देशपांडे, डॉ. मंगला वैष्णव, डॉ. संगीता देशमुख यांनी केले आहे.
व्याख्यान :
दि इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स इंडिया अणि शासकीय अध्यापक महाविद्यालयातर्फे शनिवारी दुपारी 4.30 वाजता उद्योजक मोहिनी केळकर यांचे व्याख्यान होणार आहे. प्रा. प्रकाश शिरसाठ महिला सबलीकरणावर विचार मांडतील.
मोफत आरोग्य शिबिर : हजरत बुर्‍हानोद्दीन गरीब मल्टिपर्पज वेल्फेअर सोसायटी व होली स्पिरिट संस्थेतर्फे मोफत आरोग्य शिबिर होणार आहे. आदर्श क्लिनिक कोकणवाडी, क्रांतीनगर, अदालत रोड डॉ. वरे हॉस्पिटलसमोर हे शिबिर होत आहे. जीवनबाई तापडिया चॅरिटेबल ट्रस्ट व मनपातर्फे तापडिया डायग्नोस्टिक सेंटर बन्सीलालनगर येथे आरोग्य शिबिर होईल.
महात्मा गांधी मिशनच्या सक्षमा महिला संघटनेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणार्‍या सात महिलांची निवड केली आहे. त्यांचा शनिवारी सकाळी 11 वाजता रुक्मिणी सभागृहात सक्षमा पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे, अशी माहिती रेखा शेळके यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून मोहिनी केळकर, सीताबाई मोहिते, जयर्शी जाधव, शशिकला बोराडे, अनुराधा कदम यांची उपस्थिती राहील. महिला दिनानिमित्त हेल्पलाइन सुरू करण्यात येत आहे.
यांचा होणार गौरव
सत्कारमूर्तींमध्ये पत्रकार प्रज्ञा देशपांडे, प्रगतिशील महिला शेतकरी सीमाबाई मोहिते, उद्योजक मोहिनी केळकर, क्रीडाक्षेत्रात छत्रपती पुरस्कारप्राप्त कार्तिकी शिरडकर, स्नेहा ढेपे, तेजस्विनी मुळे, दामिनी पोलिस पथकाच्या सहायक पोलिस निरीक्षक सुनीता मिसाळ, सॉफ्टवेअर इंजिनिअर अपर्णा चिमरुलू यांचा समावेश आहे.