आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार फुटांच्या ड्रममध्ये बुडून महिलेचा अंत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- साडेचार फुटांच्या ड्रममध्ये बुडून पाच फूट उंचीच्या 31 वर्षीय विवाहितेचा अंत झाल्याची घटना मंगळवारी (2 जुलै) सकाळी 7.30 वाजता शिवाजीनगरात घडली. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असली तरी पोलिसांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. शारदा सुधाकर जाधव असे मृत महिलेचे नाव आहे.

घरातील बाथरूमजवळ असलेल्या साडेचार फूट उंचीच्या ड्रममधून शारदा या पाणी काढण्याचा प्रयत्न करत होत्या. अचानक तोल जाऊन त्या आत पडल्या आणि त्यांचा काही मिनिटांतच अंत झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी या घटनेची सायंकाळी उशिरा नोंद केली. महिलेचा मृतदेह ड्रममधून बाहेर काढण्यात आला असून उत्तरीय तपासणीसाठी घाटीत पाठवण्यात आला आहे. अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण समोर येईल. तपास जमादार फरताडे करत आहेत.