आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महिला विव्हळत होती, पण दवाखान्यात घेतले नाही! रस्त्यावरच भरचौकात झाली प्रसूत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज- केवळ नाव नोंदवले नाही म्हणून प्रसूतीसाठी दवाखान्यात दाखल करून घेतल्याने जोगेश्वरी येथील सपना भोसले (२५) या महिलेची औरंगाबाद-नगर महामार्गावरील एएस क्लब चौकात रस्त्यातच प्रसूती झाली. मंगळवारी दुपारी प्रवासी महिलांनी चादर, साड्या मिळेल ते कपडे आणून प्रसूती केली. घटनेची माहिती मिळताच १०८ रुग्णवाहिका डॉक्टर अमोल कोलते यांनी घटनास्थळी धाव घेत बाळाची नाळ कापून महिलेला घाटीत दाखल केले. 

जोगेश्वरीत राहणाऱ्या सपना हिचे मंगळवारी दुपारी अचानक पोट दुखू लागले. तेव्हा पती भुसकर भोसले (२९) याने तिला अॅपे रिक्षातून बजाजनगरातील एका खासगी रुग्णालयात नेले. तेथे नाव नोंदवले नाही या क्षुल्लक कारणावरून डॉक्टर परिचारिकांनी तिला दाखल करून घेण्यास नकार देत घाटीत जाण्याचा सल्ला दिला. घाईत तपासणीचे कागदपत्र विसरले, तुम्ही दाखल करून घ्या, अशी विनवणी करूनही कर्मचाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. यादरम्यान महिलेला कळा सुरू झाल्या. तेव्हा पती-पत्नी बाळू फंटे यांच्या रिक्षाने घाटीकडे निघाले. मात्र त्रास वाढल्याने रिक्षा रस्त्यातच थांबवली. 

महिला प्रवासी मदतीला धावल्या
एएसक्लब चौकात एक महिला असह्य प्रसूती वेदनांमुळे विव्हळत असल्याचे पाहून औरंगाबाद येथील काम आटोपून खडक-नारळाच्या दिशेने जाणाऱ्या मंदा मंुजाळ, कचरा वेचणारी महिला अन्य एक अशा तिघींनी सपनाच्या दिशेने धाव घेतली. तिला रिक्षातून खाली उतरवत एका झाडाखाली बसवले. चादर, साडी असे हाताला लागेल ते कपडे घेऊन तिची प्रसूती केली. दुपारी तीन वाजता सपनाने गोंडस मुलीला जन्म दिला. त्याच वेळी औद्योगिक परिसरातून काम आटोपून घरी जाणाऱ्या विकास पगारे यांनी १०८ क्रमांकावर फोन करून रुग्णवाहिका बोलावली. त्यानंतर महिलेला घाटीत दाखल केले. 

आजचा दिवस सत्कारणी 
एक महिला विव्हळत असल्याचे पाहून धाव घेत तिला मदत केली. आजचा दिवस खरोखर सत्कारणी लागल्याचे मला समाधान वाटत आहे. 
- मंदा मुंजाळ, मदतीसाठी धावून आलेली प्रवासी
बातम्या आणखी आहेत...