आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बचत गटांच्या उत्पादनांचे गुरुवारपासून प्रदर्शन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ग्रामीण भागातील दारिद्र्यरेषेखालील महिला बचत गटांनी निर्मिलेल्या हस्तकला आणि विविध उत्पादनांचे औरंगाबाद विभागीय आणि जिल्हास्तरीय विक्री व प्रदर्शन तापडिया कासलीवाल मैदान येथे १३ ते १९ नोव्हेंबरदरम्यान भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनात ८ जिल्ह्यातील एकूण २७० बचत गट सहभाग नोंदवणार आहेत. खवय्यांसाठी अस्सल ग्रामीण भागातील विविध प्रकारचे खाद्य पदार्थांची रेलचेल राहणार आहे.

बचत गटांनी उत्पादित केलेल्या विविध उत्पादनांमध्ये प्रामुख्याने बंजारा ड्रेसेस, घोंगडी, लाकडी खेळणी, ग्रीटिंग कार्ड, महिलांसाठी तयार केलेल्या बॅग, हस्तकलेद्वारे निर्मित वस्तू, उत्पादनांमध्ये मिरची पावडर, हळद पावडर, लोणचे, आवळा कँडी, आवळा ज्यूस, आयुर्वेदिक औषधी, रानमेवा आदी उत्पादने विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत. या प्रदर्शनामुळे शहरातील नागरिकांना ग्रामीण भागातील वस्तूंच्या खरेदीचा आनंद घेता येणार आहे. या प्रदर्शनात २७० स्टॉल लावण्यात येणार आहे. सहभागी महिलांची सुरक्षित निवास व्यवस्था, निवास व्यवस्थेपासून ते प्रदर्शन स्थळापर्यंत ने-आण करण्यासाठी वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. शासन निर्णयानुसार २०१३ - २०१४ मध्ये विभागस्तरावर आदर्श व सक्षम स्वयंसहायता गटांना राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार योजनेंतर्गत प्रथम, द्वितीय, तृतीय पुरस्कार देण्यात येणार आहे. गटांना पुरस्कार प्राप्त रकमेचा धनादेश, स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. यासाठी विभागीय महसूल आयुक्त संजीव जयस्वाल, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, दीपक चौधरी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांच्यासह महसूल विभागाचे उपायुक्त व्ही. व्ही. गुजर प्रयत्नशील आहेत.