आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Work Procrastination. District Council Officers Severely Held On Siionni

कामात दिरंगाई । जिल्ह परिषदेतील अधिकार्‍यांना सीईओंनी धरले धारेवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद-जिल्हा परिषदेचा पदभार सांभाळल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी यांनी अधिकार्‍यांना समज देऊन प्रत्येक विभागाने त्यांची कामे व्यवस्थित करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतरही अधिकार्‍यांकडून कामात कुचराई करण्याचे प्रकार वाढल्याने गुरुवारी (16 जानेवारी) अधिकार्‍यांची कानउघाडणी करून अध्र्या तासात खोळंबलेली कामे मार्गी लावली. यामुळे जिल्हा परिषदेत गरमागरम वातावरण होते.

मागील महिन्यात मुख्यमंत्र्यांनी दुष्काळ निवारण्यासाठी तलावातील गाळ काढण्यासाठी खास बाब म्हणून दोन कोटी रुपये दिले होते. सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक सौंदणकर यांनी तलावातील गाळ काढण्याचे काम र्मजीतील सदस्यांना दिल्यामुळे नाराज झालेल्या इतर सदस्यांनी हे प्रकरण पालकमंत्री, आमदार, जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत नेले होते. याप्रकरणी चौधरी यांनी संबंधित अधिकार्‍यांना चांगलेच खडसावले. 28 गावांत कामे होणार असून त्याचे टेंडर काढण्यात येणार असल्याचे अधिकार्‍याने सांगताच ही सर्व कामे तत्काळ रद्द करा, 56 गावांचा समावेश करून त्यात लोकसहभाग घ्या, टेंडर काढण्याऐवजी कामे ग्रामपंचायतीला द्या, अशा सूचना त्यांनी दिल्या. मार्चपर्यंत या कामांना स्थगिती देण्यात आली आहे.

11 कोटी 27 लाख रुपयांची कामे मार्गी लावण्याच्या सूचना

जिल्ह्यात 95 नवीन शाळाखोल्या बांधकामासाठी आलेला 11 कोटी 27 लाख रुपयांपैकी 2 कोटी पाच लाख 70 हजार रुपयांचा निधी पडून आहे. शिक्षण व बांधकाम विभाग यावर केव्हा निर्णय घेणार असा प्रश्न चौधरी यांनी उपस्थित केला. यावर ग्रामपंचायतीला काम देणार असल्याचे शिक्षणाधिकार्‍यांनी सांगितले. त्यावर लेखाधिकार्‍याने ग्रामपंचायतीला 15 लाख रुपयांपेक्षा जास्त कामे देता येणार नसल्याचे निदर्शनास आणून देताच, निधीची रक्कम वर्ग करून त्यातून कामे करण्यासंदर्भात पत्र लिहा आणि 10 मिनिटांत ते पत्र मुख्य लेखा व वित्त अधिकार्‍यांना द्या, 31 मार्चपर्यंत सर्व कामांचा निपटारा करून निधीचा योग्य वापर करा असे आदेश दिले.

चौघांना कारणे दाखवा नोटिसा

निकृष्ट सौरदिव्यांचे वाटप करून प्रशासन आणि लाभार्थींची फसवणूक केल्याप्रकरणी समाजकल्याण विभागाच्या चार कर्मचार्‍यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. त्यांचा खुलासा आल्यावर गुन्हे दाखल करण्यासह निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे.

अधिकार्‍यांना धारेवर धरले

सिंचन अभियंता सौंदणकर, शिक्षणाधिकारी नितीन उपासनी, बांधकाम अभियंता भरत बाविस्कर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी डॉ. विलास जाधव यांची सीईओ दीपक चौधरी यांनी विविध कामांवरून चांगलीच कानउघाडणी केली.