आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्मार्ट सिटीतील कामे याच महिन्यात सुरू !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शेंद्रा ते बिडकीन या अडीच हजार एकर परिसरात उभारल्या जाणाऱ्या स्मार्ट सिटीचा श्रीगणेशा मे महिन्यातच होणार असून याच महिन्यात पायाभूत सुविधांसाठी ५०० कोटींच्या निविदा निघणार असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शनिवारी दिली.
सुभाष देसाई हे शनिवारी "दिव्य मराठी'च्या इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड वितरण समारंभासाठी शहरात आले असता काही वेळ सुभेदारी विश्रामगृहावर थांबले होते. या वेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्यातील उद्योग क्षेत्रातल्या ताज्या घडामोडींची माहिती दिली. ते म्हणाले की, डीएमआयसीची कामे मे महिन्यातच सुरू होणार अाहेत. तेथे पायाभूत सुविधा उभारणीचे कामही काही दिवसांतच सुरू होईल. यासाठी मंजूर झालेल्या १२०० कोटींपैकी ५०० कोटींच्या कामांच्या निविदा मे २०१५ मध्येच काढण्यात येणार आहेत.
विजेची जोडणी ९० दिवसांत : महाराष्ट्रातीलबहुतांश उद्योग गुजरातकडे जात आहेत. त्यावर महाराष्ट्र शासन गांभीर्याने विचार करत असून उद्योग धोरणात अनेक नियम शिथिल केले जात आहेत. आता उद्योगांना वीज जोडणी केवळ १५ दिवसांत मिळणार आहेत. पूर्वी त्यासाठी ९० दिवस लागायचे. शासन उद्योगांचे वीजदर कमी करण्याचाही विचार करत आहे, असेही देसाई यांनी सांगितले.
वैजापूरला मका प्रक्रिया उद्योग
मराठवाड्यातमक्याचे चांगले उत्पादन होते यावर वैजापूरसह अनेक भागांत मका प्रक्रिया उद्योग शासन सुरू करणार आहे, असेही देसाई यांनी या वेळी स्पष्ट केले. तसेच अमरावतीप्रमाणेच चाळीसगावला टेक्स्टाइल पार्क उभारण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
१२०० भूखंड ताब्यात घेतले
एमआयडीसी भागात ज्या उद्योजकांनी जमीन किंवा भूखंड ताब्यात घेऊनही उद्योग उभे केलेले नाहीत, अशा चार हजार उद्योगांना नोटिसा पाठवण्यात आल्या. त्यापैकी सरकारने १२०० भूखंड परत मिळवले असून हे भूखंड आता गरजू उद्योजकांना दिले जाणार आहेत. तसेच उद्योग सुरू करण्यासाठी एकूण ७६ परवाने लागत होते. त्यांची संख्या कमी करण्यात आली असून आता फक्त २५ परवान्यांवर उद्योग सुरू करता येऊ शकतो, असे सांगून अकृषक परवान्यांचे अधिकार आता जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचे उद्योगमंत्र्यांनी स्पष्ट केले.
बातम्या आणखी आहेत...