आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामगार वसाहतीतील खत प्रकल्प रखडला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज- बजाजनगरातील कच-यावर आधारित सेंद्रिय खत प्रकल्प रखडला आहे. कामगार वसाहतीतील विविध भागांत कच-यांचे ढीग साचल्याने दुर्गंधी पसरली आहे. परिणामी रहिवासी कामगारांना विविध गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे.
परिसर स्वच्छ ठेवल्यास येथील कामगारवर्गाचे आरोग्य चांगले राहील, या उद्देशाने येथील कच-यावर प्रक्रिया क रून सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्प उभारण्याचा निर्णय औरंगाबाद पंचायत समितीच्या तत्कालीन गटविकास अधिका-यांनी साडेचार वर्षांपूर्वी घेतला होता. त्यासंदर्भात, हा प्रकल्प ग्रामपंचायत स्तरावर राबवण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनास मार्गदर्शन करण्यात आले होते. त्यानंतर ग्रामपंचायतीने येथील स्मशानभूमी परिसरातील जागेवर शिक्कामोर्तबही केले होते. त्यासंदर्भात या प्रकल्पाला बाराव्या वित्त आयोगातून घनकचरा व्यवस्थापनासाठी निधी उपलब्ध क रून द्यावा, असा ठराव ग्रामपंचायतीने घेऊन तो औरंगाबाद पंचायत समितीकडे पाठवला होता. या सर्व प्रक्रियेला तब्बल साडेचार वर्षांचा कालावधी उलटला आहे. मात्र, या प्रकल्पाकडे कुणालाही लक्ष देण्यास वेळ नसल्याने खत निर्मिती प्रकल्पाचे भिजत घोंगडे पडले आहे. कामगार वसाहतीच्या लोकसंख्येत दिवसेंदिवस भर पडत असल्याने हा प्रकल्प तातडीने होणे महत्त्वाचे ठरणार आहे. लोकप्रतिनिधींनी या प्रकल्पाकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याची मागणी कामगारवर्गातून होत आहे. या प्रकल्पाच्या जागेचा प्रस्ताव एमआयडीसीच्या मुंबई कार्यालयाकडे पडून असून वरिष्ठ अधिका-यांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही.