आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामगारांची भूतदया, वन विभागाच्या ‘चेष्टा’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चिकलठाणाएमआयडीसीमध्ये मुख्य रस्त्यावर वाहनाची धडक लागल्याने एक वानर जखमी झाले. ते रस्त्यावरच बसून होते. त्याचा जीव धोक्यात असल्याने दोघांनी भूतदया दाखवत अडीच तास वाहतूक वळवण्यासाठी प्रयत्न केले. वन विभागाला बोलावण्यात आले. पण त्यांच्याकडे यंत्रणा नसल्याचे पुन्हा एकदा उघड झाले.
वृक्षतोड, पाण्याचा अभाव यामुळे वन्य प्राणी मानवी वसाहतींकडे वळत असल्याचे चित्र अनेकदा पाहायला मिळत आहे. असाच प्रकार आज (मंगळवार) बॉम्बे फोर्ज कंपनीसमोर घडला. एक वानर रस्ता ओलांडताना जखमी झाले. या आघाताने त्याला धक्का बसला. ते रस्त्यावरच बसून राहिले. वाहनांचा धोका ओळखून सीटीआर कंपनीचे सुरक्षारक्षक इंदलसिंग सुंदरहेडे यांनी वाहतूक वळवायला सुरुवात केली. तासभर ते रस्त्यामध्ये उभे होते. हा प्रकार पाहून महाराष्ट्र डिस्टिलरीमध्ये ऑपरेटर असलेल्या संघानंद शिंदे हेही मदतीला धावले. शिंदे सर्पमित्र असल्याने त्यांनी वन विभागाला फोन केला. वाहतूक नियंत्रण करण्यासाठी पुढे आले; पण गोंधळलेल्या वानराने घाबरून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र ते दूर जाऊ शकले नाही. सुंदरहेडे यांनी इतरांच्या मदतीने काही साहित्य जमवले. अर्ध्या तासातच वन विभागचे कर्मचारी पोहोचले. मात्र, त्यांच्याकडे कोणतीही यंत्रणा नसल्याने ‘जुगाड’ पद्धतीने वानराला डॉक्टरकडे नेऊन उपचार करण्यात आले.

-माकडांना पकडण्यासाठी विशेष स्वतंत्र पथकासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवलेला आहे. आज पकडलेले माकड सुरक्षित आहे. त्याच्यावर शासकीय पशुवैद्यकीय अधिकारी उपचार करत आहेत. अजितभोसले, उपवनसंरक्षक
पुढील स्‍लाइडवर पाहा, घटनाक्रम