आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टपरीधारकांनी लढ्यासाठी तयार राहावे, कामगार नेते बुद्धिनाथ बराळ यांचे जाहीर सभेत आवाहन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज - गेल्या २५ वर्षांपासून टपरीधारक आपले व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. एकीकडे सरकारकडून गरिबांना घरे बांधून देण्याचे सांगितले जात आहे, तर दुसरीकडे सरकारचाच एक भाग असलेले ग्रामपंचायत प्रशासन त्यांची दुकाने तोडून टपरीधारकांना बेरोजगार करू पाहत आहे. ग्रामपंचायत प्रशासन अतिक्रमण ठरवून टपरीधारकांवर उपासमारीची वेळ आणण्याचा घाट घालत आहे.
 
परंतु आपण सर्वांनी एकजुटीने त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडू. टपरीधारकांनी घाबरून जाता लढा देण्यासाठी तयार राहावे, असे आवाहन भारतीय कम्युनिस्ट पक्षप्रणीत आयटक संघटनेचे कामगार नेते बुद्धिनाथ बराळ यांनी गुरुवारी केले. वाळूज येथील कमलापूर रस्त्यावर आयोजित लालबावटा हातगाडी टपरीधारक संघटनेच्या जाहीर सभेत ते बोलत होते. 

सरपंच सुभाष तुपे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. ग्रामपंचायत सदस्य फैयाज कुरेशी, माजी ग्रामपंचायत सदस्य अनिल तुपे विशाल बराळ यांची प्रमुख उपस्थिती होती. कामगार नेते पुढे म्हणाले की, येथील बाजारतळाच्या गट क्र. ३४० ३४१ या सरकारी जमिनी आहेत. या जमिनीवर आठवडी बाजार गेल्या अनेक वर्षांपासून भरतो. हा बाजार टिकला तर टपरीधारकांचा व्यवसाय वाढणार आहे. त्यासाठी आठवडी बाजारही टिकणे महत्त्वाचे आहे. 

मात्र, जर ग्रामपंचायत प्रशासन टपरीधारकांना बेरोजगार करून रस्त्यावर आणणार असेल तर हे हाणून पाडले जाईल. ग्रामपंचायतीचा हा बेत कधीही तडीस नेला जाऊ देणार नाही. त्यासाठी आपली सर्वांची एकजूट महत्त्वाची आहे. आमचा विकासकामाला कधीही विरोध नव्हता आताही नाही. विकास झालाच पाहिजे; परंतु विकास करत असताना गरीब गरजूंवर अन्याय होता कामा नये. अडथळा होणारे अतिक्रमण काढण्यास आमची तयारी आहे. त्याचबरोबर किमान टपरीधारकांना रेकॉर्डवरील जागांच्या नोंदीप्रमाणे जागा राहू द्यावी. उर्वरित जागा आठवडी बाजारासाठी सोडण्यास म्हणजेच तेथील अतिक्रमण काढण्यास ग्रामपंचायत प्रशासनास मदत करण्याची आमची तयारी असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. 
बातम्या आणखी आहेत...