आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदारांना देता दुप्पट दाम, कामगारांना नाही छदाम!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - आमदारांना दुप्पट पगार, पण कामगारांना पहिला वेतनही अायोग लागू नाही, अशा घोषणा देत केंद्र राज्य सरकारच्या धोरणांचा निषेध करीत पाच हजारांवर कामगारांनी आपली भावना विभागीय आयुक्तालयावर विराट मोर्चा काढून सरकारला कळवली. दहापेक्षा जास्त कामगार संघटनांनी एकत्र येत क्रांती चौक ते विभागीय आयुक्तालय असा शिस्तबद्ध मोर्चा काढला. एसबीआय वगळता सर्व राष्ट्रीयीकृत बँका बंद असल्याने शहरात ६०० कोटींपेक्षा जास्त व्यवहार ठप्प झाले. साधी चेक डिपॉझिटची सुविधाही मिळाली नसल्याने ग्राहकांची गैरसोय झाली.
कामगार नेते डॉ. भालचंद्र कांगो, उद्धव भवलकर, प्रा. राम बाहेती, सुभाष लोमटे, देविदास तुळजापूरकर यांच्या नेतृत्वाखाली सुमारे पाच हजार कामगारांनी मोर्चा काढला. एकूण १४ मागण्यांचे निवेदन आयुक्तांना देण्यात आले. कामगारांना दिवाळी बोनस १५ हजार रुपये करा, खासगीकरण बंद करा, बंद उद्योगांतील कामगारांना हजार रुपये निर्वाह भत्ता द्या, कामगारांना किमान वेतन १८ हजार रुपये करा, शिक्षणाचा बाजार बंद करा, अशा मागण्यांचे फलक मोर्चेकरी झळकवत होते. यात सत्तर टक्के महिला कामगारांचा समावेश होता. सकाळी अकराला निघालेला हा माेर्चा शहागंजमार्गे विभागीय आयुक्तालयावर धडकला. त्याचवेळी पाऊसही सुरू झाला. भर पावसातच नेत्यांची भाषणे झाली.

राज्य केंद्र सरकारच्या कामगार कर्मचारीविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी पाच हजारांवर कामगारांनी विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला. छाया : अरुण तळेकर.
कामगार संघटनांच्या संपाला जिल्हा परिषदेतील अधिकारी-कर्मचारी संघटनांकडून अल्प प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. जिल्ह्यात जि. प. चे गट आणि मध्ये १३९ अधिकारी आहे.
वर्गात हजार१३७ , मध्ये ५८८ कर्मचारी आहेत. गटातून अधिकारी, मधून १७०, मध्ये १९ कर्मचारी रजेवर आहेत.

संपात अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला नाही. वर्गातील ५६१ आणि वर्गातून केवळ असे एकूण ५६३ कर्मचारी संपात सहभागी झाले होते. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, अशी माहिती समान्य प्रशासनाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजूषा जाधव यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.

शाखाधिकारी बसून
बँका बंद असल्याने ग्राहकांची तारांबळ उडाली. पेन्शनर ज्येष्ठ नागरिकांचे हाल झाले. बँकांना बाहेरून कुलूप होते. फक्त शाखाधिकारी बसून होते. शहागंजची एसबीएच, क्रांती चौकातील बीआयओ या प्रमुख बँका बंद राहिल्याने इतर बँकांचे रोख व्यवहार कोलमडले.

सरकारचा धिक्कार
कामगारांना देशोधडीला लावून उद्योगांना मोठे करणाऱ्या मोदी सरकारचा निषेध असो, देवेंद्र फडणवीस सरकार हाय हाय, आमदारांना दुप्पट दाम, कामगारांना नाही छदाम अशा गगनभेदी घोषणांनी विभागीय आयुक्त कार्यालय दणाणून गेले होते.

या संघटना मोर्चात
सिटू,आयटक, एचएमएस, इंटक, पँथर पॉवर, मविकासे, अंतर्गत कासे, छावा, मजकासे, राज्य कर्मचारी संघटना, बीएसएनएल संघटना, एआयबीईए, घरेलू कामगार संघटना, अंगणवाडी कर्मचारी संघटना आदी संघटनांचे पदाधिकारी, कामगार कर्मचारी या मोर्चात सहभागी झाले होते.
बातम्या आणखी आहेत...