औरंगाबाद - शेतकरी आणि मजुरांना नोटाबंदीचा फटका बसला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात रोहयोवर कामाची मागणी वाढत आहे. मराठवाड्यात १७१७ कामांवर तब्बल ९८२७ मजूर आहेत. गेल्या काही दिवसांत कामांची मागणी वाढत असल्याची माहिती रोहयोचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विकास कुंभार यांनी “दिव्य मराठी’शी बोलताना दिली. मराठवाड्यात या वर्षी चांगला पाऊस झाला असल्याने दुष्काळाचे चित्र नाही. त्यामुळे रोहयोवर मजुरांची संख्या वाढणे अपेक्षित नाही. मात्र, नोटाबंदीनंतर मजुरांना काम मिळत नसल्यामुळे मजूर रोहयोकडे वळत आहेत. त्यामुळे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ही संख्या दहा हजारांच्या जवळपास गेली आहे.
दोन महिन्यांत दुप्पट झाली मजुरांची संख्या : नोटांबदीपूर्वीनोव्हेंबरला मराठवाड्यात मजुरांची संख्या ५०२६ होती. मात्र, २९ डिसेंबर ते जानेवारीदरम्यान ही संख्या ९८२७ इतकी झाली. विशेष म्हणजे त्या अगोदरच्या आठवड्यात ही संख्या ८६९३ इतकी होती. आठवड्याभरात ही संख्या ११३४ ने वाढली. नोटाबंदीनंतर मजुरांना काम मिळणे अवघड झाले आहे. शहरातील मजुरांच्या अड्ड्यावर अनेक जण कम मिळाल्याने परत जात आहेत. तालुकास्तरावरदेखील नोटाबंदीचा फटका मजुरांना बसला आहे. त्यामुळे दुष्काळ नसतानाही जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात ही संख्या दहा हजारावर पोहोचली आहे.
गेल्या वर्षी होते ५१ हजार मजूर : जानेवारी२०१६ च्या पहिल्या आठवड्यात मराठवाड्यात मजुरांची संख्या ५१०२४ होती. यात ६१३१ कामे सुरू होती. औरंगाबाद जिल्ह्यात ३०५५, जालना २३७१, परभणी ९१०४, हिंगोली २९०८, बीड ८१३९, नांदेड ३९९८, उस्मानाबाद ९५३४, लातूरला ११८३७ मजूर होते. मराठवाड्यात गेल्या वर्षी भीषण दुष्काळ असल्यामुळे ही संख्या इतक्या मोठ्या प्रमाणात होती. हा आकडा दोन लाखांपेक्षा अधिक होता. या वर्षी दुष्काळ नसतानाही मजुरांच्या संख्येत वाढ होत आहे.
ग्रामीण भागात मागणी वाढतेय : मजुरांनाकाम मिळत नसल्यामुळे गेल्या काही दिवसांत रोहयोच्या कामाची मागणी वाढत आहे. त्यामुळे सर्वांना काम देण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत- विकास कुंभार, उपमुख्य कार्यआरी अधिकारी, रोहयो, औरंगाबाद
नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक मजूर
नांदेडजिल्ह्यात मजुरांची संख्या सर्वाधिक ३१५५ इतकी आहे. मराठवाड्यात सध्या १७१७ रोहयोची कामे सुरू असून त्यावर हे मजूर काम करत आहेत. शेततळे, विहिरीची कामे सुरू असल्याचे कुंभार यांनी सांगितले. नांदेडनंतर जालना जिल्ह्यात १७५४, औरंगाबाद जिल्ह्यात ही संख्या १५२२ आहे, तर परभणी जिल्ह्यात सर्वात कमी केवळ ९६ मजूर आहेत.
रोहयोची मजुरी वाढवण्याची गरज
नोटाबंदीनंतर मजुरांचे हाल होत आहेत. रोहयोमध्ये केवळ १९५ रुपये मजुरी आहे. त्यामुळे ही मजुरी वाढवण्याची गरज आहे. काम मिळत नसल्यामुळे लोक रोहयोचा आधार घेत आहेत. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना ज्याप्रमाणे वेतन दिले जाते, त्याप्रमाणे रोहयोवर वेतन देण्याची गरज आहे -सुभाष लोमटे, अध्यक्ष, मराठवाडा लेबर युनियन.
जिल्हा कामे मजूर संख्या
{औरंगाबाद४१२१५२२
{जालना ६६६१७५४
{परभणी २७९६
{हिंगोली ५९
{बीड १९९१२५२
{नांदेड २०३३१५५
{उस्मानाबाद १२४९२७
{लातूर ६५९६१
{एकूण १७१७९८२७