आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अचूक उत्पादनासाठी कामगारांच्या शरीरावर बसवताहेत सेन्सर, चुका टाळण्यात मिळते यश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - कंपनीत काम करताना तंतोतंतपणा (प्रिसिजन) व अचूकता (अॅक्युरेसी) या शब्दांना कमालीचे महत्त्व आले आहे. निर्मिती प्रक्रियेत मानवी चुका कमी करण्यासाठी कामगारांसह अधिकाऱ्यांच्याही शरीरावर सेन्सर बसवले जात आहेत. त्यामुळे कोणत्या मशीनवर कोणी किती  काम केले? किती उत्पादन निर्मिती झाली ? याचा अंदाज मालकाच्या मोबाइलवर क्षणार्धात जात आहे. औरंगाबादेत पाच ते सहा मोठ्या उद्योगांनी ही डिजिटाइज उत्पादन प्रणाली विकसित करून तिचा वापर सुरू केला आहे. 
 
जगभरात आता दर्जेदार निर्मितीवर (मॅन्युफॅक्चरिंग एक्सलन्स ) भर आहे. या तंत्रामुळे वीज, वाया जाणारे उत्पादन यात किमान ३० ते ३५ टक्के बचत होत असल्याचा दावा उद्योजक तथा  कंपन्यांच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी केला. सध्या उद्योग क्षेत्रात ४.० (फोर पॉइंट झीरो) ही प्रणाली या डिजिटाइज तंत्रज्ञानासाठी वापरली जात आहे.
 
यात कंपनीत काम करणाऱ्या मनुष्याच्या शरीरावर सेन्सर बसवले जातात. हे सेन्सर मशीनसह जॉब फ्लोअरवरची लहानसहान कृती टिपतात. त्यामुळे मिनिटागणिक होणाऱ्या उत्पादनात काही बदल झाला आहे का?  कोठे ब्रेकडाऊन झाले काय ?
 
याचा डेटा कंपनीतील मुख्य अधिकाऱ्यांच्या खोलीतील संगणकावर तात्काळ दिसेलच; शिवाय हा सर्व डेटा मालकाच्या मोबाइलवरही सतत अपडेट देत राहतो. त्यामुळे अचूक उत्पादन होण्यास मदत होते.  अशा प्रकारचे  डिजिटाइज  उत्पादन वाळूजस्थित एन्ड्रेस हाऊजर व स्टरलाइट आणि शेंद्रा वसाहतीतील पर्किन्स कंपनी करते आहे. 
 
सेन्सरमुळे असा होतो फायदा 
ही प्रणाली जर्मन किंवा जपानी कंपन्यांनी प्रथम विकसित केली. त्याचा फायदा जगभर होत आहे. सेन्सरमध्ये कामगार किंवा अधिकाऱ्यांची माहिती, त्या दिवशीचे त्या तासाचे तापमान,त्या क्षणाचा बॅच नंबर,किती उत्पादन झाले, किती माल वाया गेला, किती वेळा ब्रेकडाऊन झाले याचा सिस्टिमॅटिक डेटा व त्याचे डॉक्युमेन्टेशन तयार होण्यास मदत होते.
 
पर्किन्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक जावेद अहमद यांनी सांगितले की, आम्ही औरंगाबाद येथून ७५० के.व्ही.चे जनरेटर इंजिन तयार करतो. येथील तरुण हुशार आहेत, त्यांची आकलन क्षमता चांगली आहे.
 
पण जोवर उत्पादन प्रक्रियेत डिजिटायझेशन प्रणाली वापरली जात नाही तोवर मानवी  चुका  राहतात. विदेशात उत्पादन निर्यात करताना ही काळजी खूप घ्यावी लागते त्यासाठी ४.० प्रणाली अर्थात फोर्थ जनरेशन उत्पादन प्रक्रिया महत्त्वाची आहे.   शेंद्रा येथून आम्ही ७५ टक्के उत्पादन हे जगभरात पाठवू शकतो ते याच प्रणालीमुळे. 
 
लघु उद्योगांना शक्य 
सीएमआयएचे उपाध्यक्ष तथा संजय ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक प्रसाद कोकीळ म्हणाले की, एक मशीन कंपनीच्या विशिष्ट भागात लावले की, आपल्याला त्याद्वारे सर्व कंपनीवर डिजिटाइज कंट्रोल ठेवता येऊ शकतो. आम्ही ती स्वतंत्रपणे विकसित केली आहे. त्यामुळे खर्चात ३५ ते ४० टक्के बचत झाली आहे. लहान कंपन्यांतही हे शक्य आहे.
बातम्या आणखी आहेत...