आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Workshop For Sexual Harassment At Dr.babasaheb Ambedkar University

‘लैंगिक छळ’ विषयावर आज कार्यशाळा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध व तक्रार निवारण समितीतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी (16 जानेवारी) सकाळी 11 वाजता न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन होणार असून कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे अध्यक्षस्थानी असतील. प्राणिशास्त्र विभागाच्या सभागृहात दुपारी 12 वाजता अमरावतीच्या डॉ. निशा शेंडे आणि अँड. संघपाल भारसाकळे मार्गदर्शन करणार आहेत. डॉ. अनघा पाटील पहिल्या सत्राच्या, तर दुसर्‍या सत्राच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या मंगल खिंवसरा राहणार आहेत. डॉ. नीता पांढरीपांडे प्रमुख पाहुण्या असतील. उपस्थित राहण्याचे आवाहन समितीच्या अध्यक्षा डॉ. मेबल फर्नांडिस, सदस्या डॉ. मीना पाटील, डॉ. शुभांगी गव्हाणे, डॉ. सुनंदा नरवडे, नजमा शेख यांनी केले आहे.