आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘दिव्य मराठी’तर्फे आज जीएसटीवर कार्यशाळा, देशातील नामवंत तज्ज्ञ करणार मार्गदर्शन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद-  जीएसटीविषयी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी ‘दिव्य मराठी’ने देशातील नामवंत तज्ज्ञांचा परिसंवाद आयोजित केला आहे. शनिवार, १५ जुलै रोजी दुपारी ३.३० ते ५.५० या वेळेत सन्मित्र काॅलनीतील मराठवाडा साहित्य परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये इंदूरचे सीए कीर्ती जोशी, अभय शर्मा, पुणे येथील विक्रीकर विभागाचे सहायक आयुक्त सुमेरकुमार काले, औरंगाबाद येथील सीए उमेश शर्मा हे मान्यवर अर्थतज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. सर्वांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संंयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
 
 
बातम्या आणखी आहेत...