आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘कॅशलेस ट्रान्झॅक्शन’ यावर आज कार्यशाळा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद-  डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ‘कॅशलेस ट्रान्झॅक्शन’ तसेच ‘ई-ट्रान्सफर’ याविषयी मंगळवारी १० जानेवारी रोजी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. कुलगुरू डॉ.बी.ए.चोपडे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजता विद्यापीठ नाट्य सभागृहात ही कार्यशाळा होणार आहे. या कार्यशाळेत संलग्नित महाविद्यालयांचे सर्व प्राचार्य, विद्यापीठातील अधिकारी, प्राध्यापक यांना प्रशिक्षण देणार आहे. या वेळी रिलायन्स जिओचे उपाध्यक्ष आर. व्ही. बालसुब्रह्मण्यम, आय वेबटेक सोल्युशन्सचे अक्षय शहा मार्गदर्शन करणार आहेत. बैठकीत कॅशलेस ट्रान्झॅक्शन इलेक्ट्राॅनिक व्यवहाराबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. बीसीयूडी संचालक डॉ. सतीश पाटील, कुलसचिव डॉ. प्रदीप जब्दे, शंकर चव्हाण यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. 
बातम्या आणखी आहेत...